एन डी एम जे चे वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात
वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) राज्य सचिव वैभव गिते यांनी स्वतःचा जन्मदिन साजरा न करता गरिबांना मदतीचा हात देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना मुळे इतर राज्यातील व जिल्ह्यातील गोरगरीब मजूर लोक नातेपुते व परिसरात अडकल्याचे लक्षात घेऊन वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन वाढदिवसाला होणारा खर्च हे गरीबांसाठी गरजू मजूर वर्ग यांना मदत म्हणून माळशिरस तालुक्यातील चंद्रपुरी तांबेवाडी येथे मध्य प्रदेशमधील ऊसतोड मजूर कुटुंब यांना गहू,तांदूळ,तेल,साबण,माचिस,
कपड्याचा व अंगाचा साबण,खोबरेल तेल,मीठा सह जीवनावश्यक वस्तू दिल्या तसेच बोलताना वैभव गिते म्हणाले की ऍड. डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत जोपर्यंत मध्यप्रदेशातील हे कुटुंब माळशिरस तालुक्यात आहे तोपर्यंत त्यांची जबाबदारी एन.डी.एम.जे चे कार्यकर्ते घेतील.तसेच माळशिरस चे माजी सरपंच विकास धाईंजे म्हणाले की माळशिरस तालुक्यातील प्रत्येक अडकलेल्या मजुरा पर्यंत मदत पोहोचवली जाईल.मजुरांना कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासल्यास कोणताही संकोच न करता त्यांनी आमच्याशी संपर्क करावा मजुरांची अडचण सोडवली जाईल अन्न धान्य वाटप करताना शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्स चा नियम पाळून वाटप करण्यात आले तसेच यावेळी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले आहे. यावेळी वैभव गिते, विकास धाईंजे,विशाल साळवे मारुती सरगर, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे उपस्थित होते. तसेच वैभव गिते यांना ब्ल्यू जीन्स ॲप च्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऍड केवल उके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून मुंबई पुणे ठाणे कल्याण वाशिम हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्हिडीओ कॉलिंग द्वारा वाढदिवसाच्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तसेच या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.