रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात
रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) येथील रेणुका परिवाराच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच रेणुका परिवाराचे सर्वेसर्वा बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नातेपुते शहरात गरजू पंधराशे कुटुंबीयांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटपाचा प्रारंभ नातेपुते येथील समाजभूषण नगर येथून माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.गावाला कुटुंब माणुन गावामध्ये असणाऱ्या गरजू गोरगरीब कुटुंबाला धान्य,तांदूळ तसेच त्यासोबत लागणाऱ्या अन्य वस्तूंचे पॅकेट करून शहरांमध्ये वार्ड नुसार घरपोच देण्याचे नियोजन रेणुका परिवाराने केलेले आहे.संपूर्ण शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या घरपोच सेवेच्या या उपक्रमामुळे विविध सामाजिक संघटना,तरुण वर्ग या सर्वांना प्रेरणा मिळून भरपूर मदतीचे हात येऊन मानवा कडूनच मानवतेचे दर्शन घडावे.यासाठी रेणुका परिवार सततच अग्रेसर आहे.आज देशावर संकट आलेले आहे ते घालविण्यासाठी सरकारने घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे.आरोग्याच्या दृष्टीने लागणारे मास्क,निर्जंतुकीकरणासाठी चे लागणारे साहित्य वाटप करण्यासाठी गावातील प्रत्येक वार्ड नुसार रेणुका परिवाराचे सदस्य कामकाज पहात आहेत असे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले.गरजू गोरगरिबांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्यासाठी विविध वॉर्डामध्ये अमरशिल देशमुख,बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,महेश शेटे,उत्तम बरडकर,अतुल बावकर,मालोजीराजे देशमुख,धनाजी देशमुख,रणविरसिंह देशमुख,दादासाहेब लाळगे,राहुल पदमन,धनाजी पांढरे,अजित बाविस्कर,महावीर साळवे,नवाज सोरटे,शशी कल्याणी,समीर सोरटे,सागर बिचुकले,बाळासाहेब पांढरे,रोहित शेटे,शक्ती पलंगे,प्रवीण राऊत सदरील उपक्रमात सहभागी होऊन मामासाहेब पांढरे मित्र मंडळाच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे. या उपक्रमाचा नातेपुते व परिसरात लोकांच्या कडून कौतुक होत आहे.