रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन

  • रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- सोमवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने दूध दरवाढीसाठी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे.
दूध उत्पादकांना सध्या स्थिती मध्ये २० रुपये इतका दर मिळत आहे माजी.दुग्ध मंत्री महादेवजी जानकर साहेब मंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मध्ये ३५ रुपये इतका प्रति लिटर दर मिळत होता त्यामुळे शेतकरी जोमात होते सध्या या शासनाच्या काळात मिळणाऱ्या दरातून दुधाचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे दुधाला जास्त दर मिळणे गरजेचे आहे दूध उत्पादकांची स्थिती फार बिकट झाली आहे.दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा,जगविण्याचा खर्च मात्र थांबत नाही.उलट चारा,सरकी पेंड,पशुखाद्य, औषधे उपचार यासह सर्वच बाबींचा दर वाढल्याने दूध उत्पादकाचा खर्च दीडपट झाला आहे. विक्रीचे दर पडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना रोज तोटा सहन करावा लागत आहे.या सर्व बाबींचा विचार करून गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा व तालुका प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदनही देण्यात आले होते.परंतु राज्य शासनाने अद्याप कोणतेही ही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी व दुग्ध व्यवसाय यांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ए.एल.अक्कीसागर साहेब,माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब,बाळासाहेब दोडतले मा.अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ,मा.नितीनजी धायगुडे, अण्णासाहेब रुपनवर प्रदेश सरचिटणीस, माणिकराव दांगडे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, माऊली सलगरसाहेब पच्शिम महाराष्ट्र प्रभारी यांच्या आदेशाने आंदोलन छेडण्यात येणार आहे तसेच सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी 11:00 वाजता माळशिरस तहसील कार्यालय राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली सरक यांचे कडून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले की पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 35 रुपये दर व 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या मागणीसाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष माऊली सरक यांनी माहिती दिली.

You may have missed