दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.
नातेपुते: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील खास पुस्तकांसाठी व राहण्यासाठी बांधलेले घर राजगृह या निवासस्थानावर काल सायंकाळी अज्ञात माथेफिरूनी दगडफेक करून बागेतील झाडे कुंड्या यांची नासधूस करून दहशत माजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या हल्लेखोरांचा निषेध व त्यांना त्वरित अटक व्हावी म्हणून मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांचे नावे मा.तहसीलदार माळशिरस यांना सम्यक सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र व समता सैनिक दल सोलापूर बटालियन यांचे वतीने निवेदन देण्यात आले.४८ तासाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास आम्ही कोरोना लॉक डाऊन चा विचार न करता या पेक्षा तीव्र आंदोलन करू व होणाऱ्या परिणामांना राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला.हे निवेदन निवासी नायब तहसीलदार माळशिरस तुषार देशमुख यांनी स्वीकारले.या निवेदनावर संस्थेच्या वतीने अध्यक्ष सौ.संध्या सोरटे,सचिव समीर सोरटे,सदस्य सागर भोसले,सागर मोरे,आप्पा सावंत,हनुमंत सोरटे, तसेच समता सैनिक दल यांचे वतीने असि.लेफ्ट.जनरल पुणे डिविजन दादासाहेब भोसले, मेजर जनरल पी एस.ढोबळे, डीव्हिजन ऑफिसर समीर सोरटे,शंकर गायकवाड,सुरेश धाईंजे यांच्या सह्या आहेत.यावेळी प्रमोद धाईंजे,शेखर ओव्हाळ,रणजित झेंडे,वैभव सावंत,सागर मोरे,सागर भोसले उपस्थित होते तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेऊन हे निवेदन देण्यात आले.

You may have missed