*जवळा नि येथे वयोवृद्ध महिला सापडली कोरोना पाॅझीटीव्ह!
जवळा नि येथे वयोवृद्ध महिला सापडली कोरोना पाॅझीटीव्ह!
तालुक्याचे तहसिलदार, बिडीओ, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन गावातील काही भाग केला सिल
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना अपयश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उस्मानाबाद जवळा नि: प्रतिनिधी (अजिनाथ राऊत ) परांडा तालुक्यातील जवळा नि येथील ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे. सदर महीलेला पुर्वी बिपीचा व शुगर आजार होता. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांचे कुटुंबीयांनी दि.१६ जुलै २०२० रोजी शहा हाॅस्पिटल बार्शी येथे प्रथम उपचारासाठी हलवण्यात आले होते सदर हाॅस्पिटलमध्ये उपचार न झाल्याने पुढील उपचारासाठी जगदाळे मामा हाॅस्पीटल बार्शी येथे नेण्यात आले होते तपासणी झाल्यानंतर रात्री उशीरा कोरोना पाॅझीटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर दोन तासाने सदर महिलेचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला आहे.
पाॅझीटीव्ह आढळुन आलेल्या मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना आरोग्यविभागाने संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांचे स्वॅबचे नमुने घेवुन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची व गावातील एकुण ३० ते ३५ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती गावचे ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे, सज्जाचे तलाठी मोरे साहेब यांनी दिली आहे. कोरोनाचे विषाणूचे संकट निर्माण झाल्यापासून जवळा नि गावामध्ये अद्याप एकही रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आला नव्हता त्यामुळे आनखी कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण सापडतात की काय? अशी चर्चा आहे तसेच गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीच्या बाबतीत उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थीती दिवसेंदीवस बीघडत चालली असुन नागरीकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रोग फैलावत असल्याचे अनेकांचे मत असुन उस्मानाबाद जिल्हा हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे.
परांडा तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, यांनी जवळा नि गावास भेटी देऊन रुग्ण सापडलेला तांबोळी गल्लीतील काही भाग सिल करण्यात आला आहे.
तर नागरीकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेवुन नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार अनिलकुमार हेळकर व परांडा उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सय्यद यांनी केले तर परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी कोविड १९ ची लक्षणे आढळुन आल्यास किंवा बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या नागरीकांची माहिती देण्याचे आवाहन केले. कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणुन आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत परंतु नागरीकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे मत गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे, तलाठी नितीन मोरे, सरपंच नवजिवन चौधरी, उपसरपंच अशोक गवारे यांनी वेळीच उपस्थित राहुन उपाययोजना करुन सहकार्य केले.