मिनी ट्रॅक्टर च्या योजनेला 50 कोटी रुपये निधी द्या…..सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मिनी ट्रॅक्टर च्या योजनेला 50 कोटी रुपये निधी द्या…..सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
लोकप्रिय नेते वैभव गिते साहेबांचा पाठपुरावा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )–बौद्ध अनुसूचित जातींच्या बचत गटांना साडे तीन लाख रुपये किंमतीचा मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते
या योजनेसाठी वर्षातून दोनदा शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे निधी वर्ग केला जातो परंतु यावर्षीचा निधी कोरोना covid-19 या विषाणूच्या प्रादुर्भावाचे कारण देत शासनाने समाजकल्याण विभागाकडे वर्ग केलेला नाही त्यामुळे ही योजना खऱ्या गरीब गरजू बचत गटांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे बौद्ध अनुसूचित जातींच्या नागरिकांची प्रगती खुंटते आहे. याबाबत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले रामदासजी आठवले साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन अशा भयंकर परिस्थितीत शासनाने नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोणातू महत्वपूर्ण योजनेचा निधी थांबवू नये बौद्ध,अनुसूचित जातींच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याच्या योजनेस खास बाब म्हणून 50 कोटी रुपये निधी देण्याचे निर्देश प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग व आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले आहेत.