मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)-

आज मुस्लिम आरक्षण या मुद्द्यावर मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे तहसील कार्यालय माळशिरस याठिकाणी निवेदन देण्यात आले त्यामध्ये मुस्लिम समाजाला १०% आरक्षण मिळावे, निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थिती झालेली आहे. संविधानातील कलम 15  व 16 नुसार  शिक्षण आणि सरकारी नोकरी मध्ये  आरक्षण देण्याची तरतूद आहे त्या तरतूदीनुसार मुस्लिम समाजास नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात 10%  आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे निवेदन माळशिरस तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष  समन्वय समिती महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष अमीर शेख, प्रदेशाध्यक्ष रशीद शेख, महाराष्ट्र राज्य  मीडिया प्रमुख सलमान शेख, शाहाबाज शेख माळशिरस तालुका अध्यक्ष सलिम मुलाणी.आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

You may have missed