देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस येथे ओबीसी मोर्चा च्या वतीने कोरोना पुरस्कार व वृक्षारोपण संपन्न

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार राम सातपुते व भाजपा जिल्हा नेते धैर्यशील भैया मोहिते पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर तसेच पदाधिकारी
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ विद्यालय माळशिरस व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोवीड सन्मान-पुरस्कार वृक्षारोपण,आधी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते यांच्या करण्यात  आले. तसेच  या कार्यक्रमस प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे भाजपा नेते धैर्यशील भैया मोहिते-पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संजय देशमुख,नगरसेवक अशोक देशमुख, संचालक महादेव माने, गौरव गांधी,आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माळशिरस तालुक्यात कोरोना काळामध्ये पोलिस- पाटील,आशा वर्कर,पत्रकार यांनी  उल्लेखनीय काम केल्याबद्दल  त्यांचाही  सन्मान ओबीसी मोर्चा वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात धैर्यशील भैया मोहिते-पाटील व बाळासाहेब सरगर यांनी मार्गदर्शन केले.
भाजपा जिल्ह्याचे नेते धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचा सत्कार करताना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर
पुरस्कार देताना आमदार राम सातपुते धैर्यशील भैया मोहिते पाटील बाळासाहेब सरगर आप्पासाहेब देशमुख व मान्यवर

You may have missed