मेरे येथे पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )–मेरे तालुका माळशिरस येथे वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आरोग्य संख्येमध्ये वाढ होत आहे व त्या रुग्णांना रक्त साठ्यांचा तुटवडा भासत असल्याने शासन वेळोवेळी नागरिकांना रक्तदान शिबिर करण्याचे आव्हान करत आहे याच आवाहनाला प्रतिसाद देत मेरे गावचे पोलीस पाटील शहाजी गेजगे व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान घेण्यासाठी सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक यांनी सहकार्य केले. हे शिबिर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पार पडले, शिबिरास मेरे गावातील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला शिबिराचे आयोजन पोलीस-पाटील शहाजी गेजगे यांनी केले. यावेळी,अक्षय ब्लड बँकेचे डॉ.मोरे माळशिरस येथील डॉ.वाघमोडे तसेच येळीव गावचे पोलीस पाटील राजकुमार वाघमोडे गावातील, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.