पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत मोरोची पानस्कर वस्ती विद्यार्थ्यांचा अकबर शेख सर यांच्यामुळे शंभर टक्के सहभाग


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल गेली तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे 33 कोटी वृक्ष लागवड  झाडे लावा झाडे जगवा उपक्रम 2019 मध्ये प्रभावीपणे राबवला व महाराष्ट्रात दीड लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या माध्यमातून करण्यात आली. यामध्ये मोरोची पानस्कर वस्तीने शंभर टक्के सहभाग नोंदवला होता तसेच माळशिरस तालुक्यातील जि प शाळा. कारंडे, पिरळे, फोंडशिरस, कळंबोली, उंबरे दहिगाव,मार्कडवाडी,पळसमंडळ,एक्शिव शिवपुरी, धर्मपुरी, हायस्कूलमध्ये दहिगाव स्कूल दहेगाव, बा. ज .दाते प्रशाला, चंद्रकांत घुगरदरे रत्नत्रय इंग्लिश मीडियम मांडवे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची, रामदास हायस्कूल इंदापूर, राधिका हायस्कूल इंदापूर, तसेच ठाणे,कल्याण,वाशिम,हिंगोली, सातारा कोल्हापूर,पुणे उस्मानाबाद,लातूर, बीड. सांगली ,जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच या वर्षी कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेमध्ये उपक्रम घेता आला नाही म्हणून ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल याहीवर्षी दिनांक 20/9/2020/ ते 5/9/2020 झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता व जनशक्ती अभियानांतर्गत ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत याहीवर्षी पानस्कर वस्ती चे शिक्षक अकबर शेख सर यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश फी भरून रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत शंभर टक्के सहभाग नोंदवला गेला आहे म्हणून  परिसरात  अकबर शेख सर  यांचे  आदर्श शिक्षक म्हणून कौतुक होत आहे. तसेच पंचक्रोशीतील अनेक शाळेतील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले आहे.

You may have missed