नातेपुते बसस्थानकाची दुरावस्था, सुलभ शौचालय बंद असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथील बसस्थानकाचे अत्यंत दुरावस्था झाली आहे नातेपुते हे ठिकाण मध्यवर्ती बाजारपेठ असल्याकारणाने येथे नेहमीच वर्दळ असते तसेच शिखर शिंगणापूर-पंढरपूर ला जाण्याचा प्रमुख मार्ग असल्याने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. तसेच नातेपुते हे ठिकाण सोलापूर,सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. व पालखी प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे येथे बरेच लोक ये-जा करतात परंतु या लोकांचे नातेपुते येथे आल्यानंतर कसल्याही प्रकारची सोय होत नाही. कारण या ठिकाणी बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या बस बसस्थानकात प्रवाशांना व्यवस्थित बसायला बाकडे नाहीत बसस्थानकाच्या आवारात घाणीचे साम्राज्य आहे.तसेच बसस्थानकाच्या उजव्या बाजूस बी.ओ.टी तत्त्वावर सुलभ शौचालय बांधले आहे. त्याचीही अवस्था अत्यंत वाईट आहे.सध्या कोरणा प्रादुर्भावामुळे नातेपुते बसस्थानकातील शौचालय बंद असल्याने येणारे प्रवासी यांचे गैरसोय होत आहे. विशेषता महिलांची शौचालयासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सुलभ शौचालय बंद असल्याने प्रवासी वाटेल तिथे लघुशंकेसाठी बसतात त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेआहे.यामुळे रोगराई वाढत आहे.व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व गोष्टींचे एसटी महामंडळ महामंडळाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा सामाजिक संघटनांना यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.