तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना थेट मदत करण्याचा संकल्प डोळस यांचा संकल्प

संकल्प डोळस यांचा पूरग्रस्तांना मदत करण्याचा संकल्प

  
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)

मौजे पिलीव ता.माळशिरस या ठिकाणी परवा झालेल्या आतिवृष्टी मुळे स्थानिक नागरिक व्यापारी वर्गाचे  मोठ्याप्रमणावर नुकसान झाले. त्यामुळे माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस यांनी पूरग्रस्तांना नुसती भेट नव्हे तर मदत करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यांनी मौजे पिलीव या ठिकाणी जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.ज्या नागरिकांच्या घराची पडझड झाली त्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तू अन्न धान्य कीट चे वाटप केले तसे.मौजे कोळेगाव ता. माळशिरस या ठिकाणी सुद्धा झालेल्या मुसळधार  पावसामुळे  स्थानिक नागरिकांच्या घराची पडझड झाली घरामध्ये पाणी शिरल्यामुळे  मोठ्याप्रमणावर नुकसान झाले. येथील पूरग्रस्तांना सुद्धा त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.मौजे मळवली, ता. माळशिरस येथे सुद्धा पावसामुळे तेथील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पुर आला त्यामुळे ओढ्यालगत राहणार्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्याप्रमणावर नुकसान झाले सर्व संसारउपयोगी साहित्य तसेच मोठ्याप्रमणावर घराची पडझड झाली  पाळीव प्राणी वाहून गेले तेथेही संकल्प डोळस यांनी भेट दिली सर्व झालेल्या नुकसाणीची पाहणी केली लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसाणीची शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.तसेच पुरामध्ये ज्या नागरिकांच्या घराची पडझड झाली त्या नागरिकांना अन्नधान्य, जीवनावश्यक किट उपलब्ध करून दिले परिसरातील  102  पूरग्रस्त  कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तू दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे देशमुख, राेहित (दादा) पवार विचार  मंचच् प्रदेश सचिव  मच्छिंद्रजी ठवरे, माजी तालुका युवक अध्यक्ष वैभव (बाबा )जाधव, विनायक भगत व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेताना संकल्प डोळस

You may have missed