मळोली येथील पूरग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत द्या अन्यथा तीव्र आंदोलन करून- आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे
मळोली येथी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी ढगफुटीमुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन मळोली येथील दलित वस्ती पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेली आहे. त्यामध्ये घरे वाहून गेली आहेत, घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, धान्य,कपडे,मौल्यवान वस्तू,महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा वाहून गेली आहेत. मळवली येथील पूरग्रस्तांना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी भेट दिली व तेथील विदारक परिस्थिती पाहता त्यांनी शासनास आव्हान केले की लवकरात लवकर मळवली येथील पूरग्रस्तांना त्यांचे योग्य पंचनामे करून पूरग्रस्तांचे नवीन ठिकाणी गावठाणात पुनर्वसन करून,घरे बांधून तसेच पुरामध्ये वाहून गेलेली कागदपत्रे रेशनकार्ड, विविध प्रकारचे दाखले यासाठी मळवली विशेष कॅम्प घ्यावा व त्यांना जागेवरती दाखले देण्यात यावे. तसेच शासकीय मदत सुद्धा तात्काळ द्यावी अन्यथा महाराष्ट्रासह माळशिरस तालुक्यात तीव्र आंदोलन छेडू असे आवाहन विकास दादा धाईंजे यांनी केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे कार्यकारी संपादक प्रशांत खरात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.