उपमुख्यमंत्री अजित दादांकडून पुणे मेट्रो ची पाहणी
- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)
- आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. सिव्हील कोर्ट, नळस्टॉप, लकडी पूल व स्वारगेट येथील मेट्रोच्या स्टेशनला भेट दिली व कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आधुनिक पध्दतीनं बोगदा खोदकाम करणाऱ्या टनेल बोअर (टी. बी. एम.) मशिनचे अजितदादांच्या हस्ते मेट्रोच्या कामासाठी लोकार्पण करण्यात आले. याशिवाय तिकीट व्यवस्थापनाची माहिती घेतली. या पाहणीदरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील संत तुकाराम नगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. असेही आश्वासन अजितदादांनी दिले.