उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

_घटनास्थळी एन.डी.एम.जे टीमसह समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट

आरोपींची आधुनिक पद्धतीने नार्को,पॉलिग्राम लाय डिटेक्ट चाचण्या केल्यास सत्य पुढे येईल………….वैभव गिते**

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – ता. १७

            देशभरात नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचे पूजन केले जात असताना फलटण तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी राक्षसवृत्तीच्या माणसांच्या कचाट्यात सापडली आहे.  3 ऑक्टोबर रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठी अपेक्षा बाळगून फलटण पोलीस स्टेशन गाठले, पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी उलट, 'तुमच्याच मुलींमध्ये काहीतरी दोष असेल' असं सांगितलं.बेपत्ता मुलीचा तपास करायचा तर दूरच पण स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा त्वरित घेतली नाही.

सुमारे पाच ते सहा दिवसांनी म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला. मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती,त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते, तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा शिक्का ठोकला,आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कारण, संशयित आरोपी हा सवर्ण समाजातील तर पीडित मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार समाजातील आहे.उपाळवे ता.फलटण या गावात होलार समाजाचे एकच घर आहे. म्हणजे युपीच्या हाथरस ची पुनवृत्ती इथेही झाली, इथेही जातीचे राजकारण करण्यात आले.
पीडित कुटुंबाने वारंवार विनंती करूनही एफआयआर ची कॉपी आणि पोस्टमॉर्टम ची कॉपी दिली नाही. शिवाय पीडित कुटुंबानी वारंवार सांगून सुद्धा संशयित आरोपीवर हत्ये ची कलमे लावली नाहीत.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे 305 हे कलम लावलेले आहेत.मुलगी होलार समाजातील असल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनीयम 2015 मधील कलम 3 (1)r, व 3 (2)v नुसार कलमे लावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण हे करीत आहेत.पोलीस तपासाला खुप विलंब लावत आहेत
या सर्व हालचालीवरून पोलिसांचे तपासाचे कामकाज संथ व संशयास्पद वाटत आहे.
पीडित कुटुंबाने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत.यामध्ये हत्या करणारा व्यक्ती एकटा नसून त्याचे सोबती पण या हत्येत सामील आहेत,
त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. पण पीडित कुटुंब मागासवर्गीय असल्याने पोलिसांकडून तपासात कसूर होत आहे,त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत, आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गीते यांनी ही गंभीर बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता दोन तासात समाजकल्याण अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीन)सातारा यांच्याकडे आरोपीची लाय डिटेक्टिव्ह चाचणी, नार्को टेस्ट, पॉलिग्राम चाचणी या प्रकारच्या चाचण्या आधुनिक पद्धतीने करून ही आत्माहत्या न्हवे तर हत्या आहे याचे पुरावे गोळा करावे या मुख्य मागणी सह पीडित कुटुंबाचे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करून गुणवत्तेच्या आधारे परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे जर तपासात कसुरी करीत असल्यास त्यांच्याकडून तपास काढून सातारा जिल्ह्यातील इतर कर्तव्यदक्ष डी.वाय.एस.पी यांच्याकडे देण्यात यावा.अशा
मागण्या केल्या.
ऍड.सुजित नीकाळजे यांनी पीडित कुटुंबास कायदेशीर सल्ला देत सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी पीडित कुटुंबांच्या मागण्या व संस्था संघटनेच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे जेष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते,ऍड.सुजित निकाळजे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे,फलटण तालुका अध्यक्ष सागर आढाव,ऑल इंडिया पँथर सेनेचे इंदापूर ता.अध्यक्ष निलेश खरात,वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,केंद्रीय पत्रकार संघटनेची टीम घटनास्थळी उपस्थित होती. या संदर्भात माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे यांनी दिली

You may have missed