श्रीपूर येथील नियोजित बुद्ध विहार परिसरात विकासदादाधाईंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
धम्मचक्रपरिवर्तन दिनाचे औचित्य साधुन श्रीपूर येथील जगदिशनगर येथील नियोजित बौध्द विहाराच्या जागेत आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादाधाईंजे यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या नियोजित जागेत श्रीपूर येथील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशस्त असे नागपूर दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी प्रतिकृती सारखे बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे यासंदर्भात समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यावतीने सांगण्यात आले.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा विकास दादा धाईंजे, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात, मा.रतनसिंह(आप्पा) रजपुत,संदिप घाडगे वंचित बहुजन आघाडी संघटक,सागरदादा उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बौध्दविहार समिती अध्यक्ष -कल्याण लांडगे,उपाध्यक्ष -बाळासाहेब भोसले, सचिव- तेजस बाबर, खजिनदार-नवनाथ ताकतोडे ,नागेश चंदनशिवे,बालाजी ताकतोडे,कुमार ताकतोडे,गणेश चांदणे,नागेश साळुंखे गोविंद सावंत ,राहुल बाबर यांनी परिश्रम घेतले.