महात्मा फुलेंच्या सत्यशोधक वाड्यात घुमला बळीराजाचा जयघोष!

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक वाड्यात घुमला बळीराजाचा जयघोष!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे पुणे-पुण्यात सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने बळीप्रतिपदेच्या निमित्ताने कृषिसाम्राट बळीराजाची गौरव मिरवणूक गेली 16 वर्ष काढण्यात येत होती. मात्र यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर बळी पूजन आणि पानसुपरीचा कार्यक्रम समता भूमीवर महात्मा फुले वाडा येथे दि.16.11.2020 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या प्रमाणात कृषी धन वाटप करीत साजरा झाला. सुरवातीला भाज्या आणि धान्य राशीचा प्रतिकात्मक बळीराजा उभारून त्याचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरवातीला कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव आणि शीला आढाव यांच्या हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर दरवर्षी प्रमाणे डॉ. बाबा आढाव यांनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना बळीराजा वेशभूषेत असल्याने मोठा हार घालुन स्वागत केले.
यावेळी महात्मा फ़ुले रचित सत्याचा अखंड डॉ.बाबा आढाव चे मागे सर्वांनी गाऊन वातावरण बळीमय केले .याप्रसंगी इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो – सत्य की जय हो! नांगर, कणीस याने सजलेली भव्य रांगोळी शरद गायकवाड यांनी काढलेली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. .या वर्षी कोव्हिडं मुळे महात्मा फुले वाडा ते जिजाऊ लाल महाल मिरवणूक काढता न आल्याने सम्पूर्ण फुले वाड्याला ” इडा पिडा टळो बळीच् राज्य यवो” तसेच महापुरुषांचे नावाचा जय घोष करीत सद्य बळीराजा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे मागोमाग प्रदक्षिणा घालून फुले वाड्याचे दारात मान्यवरांसह सर्वाना मोट्या प्रमाणात थेट शेतातून आणलेल्या कृषीधनाचे वाटप बळीराजा रघुनाथ ढोक याचे हस्ते करण्यात आले.पानसुपरीचा कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात कोव्हिडं मुळे आज मिरवणूक काढता आली नाही असे सत्यशोधिका प्रा प्रतिमा परदेशी यांनी खंत व्यक्त करीत यावर्षी बळीराजा गौरवशाली इतिहासाला सलाम म्हणून भव्य रांगोळी आणि आकाश कंदील स्पर्धा आयोजित केल्याचे सांगून त्याला महाराष्ट्र भरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे म्हंटले व त्याचा बक्षीस समारंभ 28 नोव्हेंबर 2020 रोजी असल्याचे सांगितले. यावेळी ऍड सुभाष वारे, ऍड मोहन वाडेकर, प्राची दुधाने, राखी रासकर , बाबासाहेब जाधव या सर्वांनी मनोगत व्यक्त करत बळीराजाच्या इतिहासाला उजाळा दिला. या प्रसंगी अंकल सोनवणे, नाना निवांगुणे, प्रमोद वाघदरीकर, महेश बनकर ,आशा ढोक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियांका म्हेत्रे, व्ही जे वळवी, राजेंद्र शेलार, प्रतिक परदेशी, श्रद्धा तोडकर , आकाश-क्षितिज ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन सत्यशोधक रोहिदास तोडकर यांनी मानले.

You may have missed