नांद्रुक-पिंपरी-मोरोची हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा… माजी सरपंच राणे,सर
नांद्रुक-पिंपरी-मोरोची हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…
माजी सरपंच राणे,सर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पिंपरी ता माळशिरस येथील अत्यन्त महत्वाचा व सातारा-सोलापूर-पुणे या तिन्ही जिल्ह्यास जोडणारा रस्त्या अत्यन्त खराब झाला असून त्या वर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यावरील पुलही खचुन गेले आहेत
सदर रस्त्यावरून वाहतूक करणे अतिशय अवघड जात असून प्रवाशांना अतिशय बिकट परीस्तीतीचा सामना करावा लागत आहे
मागील दोन,तिन वर्षांपासून सदर रस्था दुरीस्थीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांचे कडे केलेली आहे
अद्यापही दुरुस्ती झाली नाही नजीकच्या काळात पिंपरी च्या ग्राम दैवताची जत्रा भरणार असून सदर रस्त्यावर असणारी काटेरी झुडपे त्वरित काढून घ्यावीत व रस्था डांबरीकरण करावा अन्यथा समस्थ ग्रामस्थ व तरूणांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्यास जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा बांधकाम विभाग अकलूज यांना माजी सरपंच राणे सर यांनी दिला आहे