विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संग्राम भाऊ देशमुख यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –माळशिरस येथे नक्षत्र कॉम्प्लेक्स मसवड रोड याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम भाऊ देशमुख यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी आप्पासाहेब देशमुख यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब वावरे,भाजपाचे ज्येष्ठ नेतेके के पाटील, सोपान काका नारनवर,भाजपा तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर,मुक्तार कोरबु, संजय देशमुख,युवराज वाघमोडे आकाश सावंत,संतोष वाघमोडे,संतोष महामुनी,आबा धाईजे,सुभाष गोसावी,ॲड मारुती वाघमोडे, शरद मदने,अक्षय वायकर,महादेव कावळे,भैय्या चांगण,महेश सोरटे, दादासाहेब खरात इत्यादी उपस्थित होते.