वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर कमिटी च्या वतीने संविधान दिन महोत्सव साजरा.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव
26/11/2020 रोजी सकाळी वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर कमिटी च्या माध्यमातून 26 नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह मिलिंद नगर एफ कॅबिन रोड कल्याण पूर्व येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटक विनोद श्यामसुंदर रोकडे याच्या वतीने करण्यात आले तत्पूर्वी 26/11/2008ला झालेल्या भ्याड हल्यात शाहिद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली व बुद्ध वन्दना घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रम दरम्यान सहभागी संघटना रेल्वे असो. A.i.sc.st.N.D.M.J.संघटना द शिल्ड संघटना व साई श्रद्धा मित्र मंडळ यांनी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम दरम्यान कोविड 19 या महामारीत महानगरपालिका आरोग्य खात्यातील कर्मचारी अगंण वाडी सेविका शिक्षक वर्ग आनंदवाडी डॉक्टर सुप्रसिद्ध गायक, पत्रकार, सामाजिक संघटना यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संविधान दीना निमित्त हेल्थ कॅम्प व बॉडी चेक अप शिबीर ,पॅन कार्ड, हॅन्डीकॅप, निराधार,पेन्शन योजना ,नागसेन बुक डेपोच्या वतीने स्टॉल लावणे आसे आयोजन करण्यात आले आले.कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव विजयजी कांबळे साहेब, भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस मुंबई ठाणे प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे, प्रमोद पिगळे (माजी नगरसेवक),जेष्ठ कार्यकर्ते अशोकजी कांबळे,बौध्दचार्य अशोकजी त्रिभुवन,जेष्ठ कार्यकर्त्यां शोभाताई केदारे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव,वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक आप्पा गस्ते,देवानंद कांबळे साहेब विनोदजी गुप्ता,जेष्ठ कार्यकर्ते नथुराम मोहिते साहेब,विक्रम जाधव ,सुरेश शिंदे,दिपक वाघ डोंबिवली विभागातील पदाधिकारी गौतम गवई,चंद्रकांत पगारे,गणेश गायकवाड,अमर कुह्रे ,डॉ.धमेद्र उपाध्यय,डॉ.संजयकुमार पाडे,डॉ.कमलेश मोरे,मनोज नायर साहेब (समाजसेवक)सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी रविंद्र सांगारे ,A.I.SC.ST रेल्वे एम्लाय असोसिएशन शाखा OHEअध्यक्ष सुनिलजी ठेंगे,साई श्रध्दा मित्र मंडळाचे पदाधिकारी बाबुराज खिस्टोपर,रियाज शेख,राहुल शिंदे ,सुनिल बैलम,सर्व महानगरपालिका कर्मचारी,अंगणवाडी सेविका,सुप्रसिद्ध गायक,पत्रकार,सर्व मान्य वर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण पुर्वचे कार्यकर्ते जितेंद्र बुकाणे यानी केले केले