ॲड.डॉ.केवल उके यांना २०२१डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१ प्रदान
ॲड.डॉ.केवल उके यांना २०२१डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१ प्रदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ठाणे बंदिष सोनवणे –आज शनिवार दिनांक .डी.एम.जे.संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांना दादर-मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचारमंच महाराष्ट्र या संस्थे च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१” प्रधान करून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.भिमरावजी यशवंत आंबेडकर हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मा.विनोद जाधव आणि स्वागताध्यक्षपदी प्राचार्य सुरेश कुराडे उपस्थित होते.
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचारमंच महाराष्ट्र” या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, कायदा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले. प्रामुख्याने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मा.प्रभाकर पोखरिकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध निर्माता निर्देशक मा.सुदाम वाघमारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मा.संदीप धम्मरक्षित, मा.शिवराम हरळकर, मा. प्रदीप कांबळे, मा.चंद्रकांत जगताप, प्राचार्य विजय मोहिते, मा.एम.के.कांबळे इत्यादी मान्यवरांना पुरस्कार, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व मानाचा निळा पट्टा देवून सन्मानित करण्यात आले.
या वेळेस कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष , मा.मनोज जाधव, मा.सुनिल सुरेखा आणि मा.जितेंद्र मोहिते यांनी केले तर निवेदन भिमशहीर जनार्दन मोहिते यांनी केले. या कार्यक्रमासाठी कवयत्री रिया पवार, कविता काळे, संदेश सावंत, उमेश पवार इत्यादीसह संस्थेच्या अनेक जिल्ह्यातील सदस्यांनी परिश्रम घेतले