उंबरे पागे ग्रामसभा शांततेत पार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धनाजी शिव पालक पंढरपूरदिनांक 1/11/ 2021 रोजी उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष कांताबाई शिंदे सरपंच होत्या ग्रामसेवक पांढरे यांनी लोकांचे स्वागत करून ग्रामसभेला सुरुवात केली असता नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी ग्रामसभा तहकूब करावी अशी सूचना मांडली कारण ग्रामसभेमध्ये अवघ्या पंचवीस लोक उपस्थित होते जोपर्यंत शंभर लोक उपस्थित असतील तर ग्रामसभा घ्या तोपर्यंत ग्रामसभा घेऊ नये असा ग्रामसभेमध्ये शिव पालक यांनी सूचना मांडली त्यानंतर काही वेळ ग्रामसभेचे कामकाज थांबले बराच वेळाने लोक जमा झाल्यानंतर ग्रामसेवकाने मागील आराखडा वाचून दाखवला पांदन रस्त्याचे कामे काँक्रिटीकरण डांबरीकरण सभामंडपाचे काम हाय मस्त दिवा कनेक्शन शासन निर्णय असे सर्व विषय ग्रामसेवक पांढरे यांनी वाचून दाखवले पुढे covid-19 च्या काळामधील लोकांचे पाणीपट्टी घरपट्टी ग्रामपंचायतीने वसुलीसाठी तगाटा लावू नये व गावामध्ये चिकनगुनिया सारख्या आजाराने लोक त्रस्त आहेत गावामध्ये ज्या ठिकाणी सांड पाणी साठले आहे आशा ठिकाणी कीटकनाशक फवारून जेणेकरून डास मरतील असे औषध धुरळणी करावी असे अनेक जनतेचे प्रश्न धनाजी शिव पालक यांनी लावून धरले त्याचबरोबर प्रहारचे तालुकाध्यक्ष नानासो इंगळे यांनी ग्रामसेवक माहिती अधिकारांमध्ये माहिती देत नसल्याबाबत खंत व्यक्त केली ग्रामपंचायतीची विकास कामे सर्व मेंबरांना वाटून द्या आणि आम्हाला पण द्या अशी अजब मागणी बापू मोहिते यांनी केली तसेच बाळासाहेब उर्फ केरु कसबे व माऊली लक्ष्मण गायकवाड उमेश गायकवाड यांनी आपल्या समस्या ग्रामसभेमध्ये मांडल्या परंतु ग्रामसभेला आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग तलाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वायरमेन असे शासकअधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु ग्रामसभे मधील प्रमुख मागणी लावून धरल्यामुळे तात्काळ उंबरे गावचे सरपंच कांताबाई शिंदे व ग्रामसेवक पांढरे यांनी अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण गावामध्ये कीटकनाशक धुरळणी करून घेण्यात आली आम्हाला ग्रामसभा माहीत नव्हती असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने ग्रामसभा दवंडी देऊन घेण्यात यावी असा सूर जनतेतून उमटू लागला