लोककलावंत शांताबाई गडपाईले यांना वालचंद नगर येथे आदरांजली अर्पण. 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


कशाला मी जाऊ कुणाच्या गटात,
सुखी आहे मी माझ्या भिमाच्या झोपडीत,
कशाला करु कुणाची हांजी हांजी,
स्वाभिमानी माणसं आहेत माझी”
असा आपल्या गायिकेच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या लोककलावंत माई उर्फ शांताबाई राजाराम गडपायले यांचे वृद्धापकाळाने सप्टेंबर महिन्यात निधन झाले. त्यांचे पती महाकवी, गायक राजानंद गडपायले यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरविले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवलेले एकमेव कवी, गायक म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले. या दांपत्याने आंबेडकरवादी चळवळ गतिमान व मजबूत करण्याचे महान कार्य केले. पतीच्या पश्चात व मुलाच्या निधनानंतर ही गावोगावी जाऊन शांताबाई यांनी प्रबोधन केले. तिन पिढ्यांच्या लोकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. व वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. घाटकोपर ला झालेले रमाबाई नगर मधील हत्याकांड व मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढाईत आपल्या शाहिरी च्या माध्यमातून चळवळीची ज्योत तेवत ठेवली. आंबेडकरवादी चळवळीतील या दांपत्याने योगदान अनन्यसाधारण आहे.
अशा माई उर्फ शांताबाई राजानंद गडपायले यांच्या निधनाबद्दल रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(ग्रामपंचायत हॉल) मध्ये “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली होती. यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे सुरजभैय्या वनसाळे,प्रा.डॉ.अरूण कांबळे, रिपाइं चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पत्रकार प्रमोद शिंदे, विशेष सरकारी वकील ॲड. अमोल सोनवणे यांनी भाषणातुन त्यांचा जीवनपट उलगडून आदरांजली वाहिली तत्पूर्वी प्रास्ताविक, सूत्रसंचालन जेष्ठ पॅंथर सु.ग. साबळे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे, शाहिद जितेंद्र धाईंजे, गायक राहुल क्षिरसागर, गायक बाळासाहेब सरवदे, गायक दिलीप भोसले यांनी गीतांच्या माध्यमातून काव्यरुपी पुष्पांजली वाहीली. यावेळी प्रा.सर्वगोड सर,”मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे अनिल केंगार, सौरभ धनवडे, सोनु मोरे, अशोक मिसाळ,बौद्ध धम्म प्रसारक आनंद फरतडे, किशोर काळे तसेच अनेक लोककलावंत, भिमसैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज वनसाळे, सु.ग. साबळे, विजय सरतापे, राहुल क्षिरसागर यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *