नातेपुते नजीक कारुंडे पुलावर कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार दोन जखमी

नातेपुते प्रतिनिधी: (प्रमोद शिंदे)
कास पठार पाहण्यासाठी जात असताना नातेपुते नजीक कारुंडे पुलावर चुकीच्या मार्गाने जात असताना कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार तर दोन जन जखमी झाले आहेत.
हकीकत आशिकी. नातेपुते कडून फलटण मार्गे कास पठारला जात असताना. नवीन रस्त्याच्या कामामुळे रस्ता चालकाच्या लक्षात न आल्यामुळे तसेच रस्त्यालगत सुचक बोर्ड कमी प्रमाणात असल्यामुळे
चुकीच्या मार्गाने निघालेल्या कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला व मायलेकासह पाचजण ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील नातेपुते जवळील कारुंडे (ता. माळशिरस) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या अपघातात राजेश अनिल शहा (वय ५५, रा. जंक्शन, ता. इदापूर), दुर्गेश शंकर घोरपडे (२८, लासुर्णे, ता. इदापूर), कोमल विशाल काळे (३२), शिवराज विशाल काळे (१०), आकाश दादा लोंढे (२५) हे जागीच ठार झाले, तर अश्विनी दुर्गेश घोरपडे (२४) व पल्लवी पाटील (३०, रा. वालचंद नगर) हे जखमी झाले आहेत.
सदर मिळालेल्या माहितीवरून लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कॉन्ट्रॅक्टर राजेश शहा हे कारने (एच ४२ एक्यू ०५६४) आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पठार पाहण्यासाठी निघाले होते. ते रस्ता लक्षात न आल्यामुळे नातेपुते येथून राँगसाइडने निघाले होते. नातेपुते नजीक कारुंडे, ता. माळशिरस येथील पुलापवर
एक्यू ३३९२) आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोखाली कार चक्काचूर झाली होती. घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र पराजणे व पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना तत्काळ ॲम्बुलन्स च्या साह्याने अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले. याबाबत दुर्गेश मोतीराम घोरपडे (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून मृत कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश घोरपडे यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर दुर्गेश यांची पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवाय कोमल काळे व त्यांचा दहा वर्षांचा मुलगा शिवराज काळे या मायलेकाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

सदर अपघात हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत असून पुणे पंढरपूर हा पालखी मार्ग महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा होते. त्यामध्ये रस्त्याचे काम संत गतीने चालू असून ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधी मधी रस्ता वळवण्यात आला आहे. व तेथे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकाच्या लक्षामध्ये रस्ता वळवलेला येत नाही. तसेच नातेपुते शहरातून निघताना शिंगणापूर पाठीजवळ फलटण कडे जाण्याच्या मार्गासाठी मोठा बोर्ड असण्याची आवश्यकता आहे. परंतु त्या ठिकाणी मोठा बोर्ड नाही मोठा बोर्ड नसल्यामुळे. वाहने रॉंग साईडने जातात. व सतत या ठिकाणी अपघात होतात. याकडे बांधकाम विभाग तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोकांना प्राण गमवावे लागतात अशा प्रकारचे मत जनसामान्यातून येत आहे. तसेच महामार्गावरती लवकरात लवकर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *