माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना वैभव गीते यांच्याकडून जन्मदिनाच्या हटके शुभेच्छा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे माझी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस राज्याचे सचिव वैभव गिते यांनी सोशल मीडियाद्वारे हटके गांधीगिरी स्टाईलने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकालाचा त्यांच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत नाराजी वजा जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

     शुभेच्छा देताना ते म्हणाले की अडीज वर्ष सामाजिक न्यायमंत्री असताना सुद्धा महात्मा जोतिबा फुले,साहित्यरत्न लोकशाहीर आन्नाभाऊ साठे,संत रोहिदास महाराज महामंडळाचे अध्यक्ष नियुक्ति करुण कर्ज प्रकरने दिली नाहीत.(त्यामुळे कर्ज माफ करण्याचा प्रश्नच येत नाही)अडीज वर्षात क्रांतिगुरु लहुजी साळवे आयोगच्या शिफारशी मातंग समाजास लागू केल्या नाहीत.
अडीज वर्षात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदुमिल येथील स्मारक पूर्ण झाले नाही.
अडीज वर्षात जातीय अत्याचारात खून झालेल्या एकाही कुटुंबाचे पुनर्वसन केले नाही. शिवाय राज्यातील अन्याय अत्याचाराच्या ठिकाणी भेटी दिल्या नाहीत.
अडीज वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील नीतीन आगे खून प्रकरणात फुटिर साक्षीदरांवर करवाई करण्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकीलांची नियुक्ति केली नाही.
अडीज वर्षात मिनी ट्रैक्टर च्या योजनेला कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले नाही.
अडीज वर्षात बौद्ध, दलित आदिवासी यांच्या हक्काचा निधि इतर विभागाना वळवू नये,निधि अखर्चित राहु नये म्हणून बजेटचा कायदा केला नाही.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नावाने विशेष अनुदान योजना सुरु करण्याची घोषणा करुण 10 वी 12 वी मधील विद्यार्थी यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास 1 लाख रूपये शिष्यवृत्ति देण्यात येईल अशी घोषणा केली साडेचार हजार विद्यार्थि यांनी बार्टी मार्फत अर्ज भरले परंतु एकाही विद्यार्थि यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा केली नाही.अडीज वर्षात atrocity act च्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ति केली नाही.अडीज वर्षात आकस्मिकता योजना जी समाजिक न्याय विभागात आहे ती लागू केली नाही.अशी दैदीप्यमान कामगिरी जी मागासवर्गीय जनता कधीही विसरनार नाही माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी करुण दाखवली आहे.त्यामुळे मी त्यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे अशाप्रकारे त्यांनी धनंजय मुंडे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत वैभव गीतेने यांनी या अगोदर सुद्धा धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री असताना अत्याचार पिढीतांचे पुनर्वसनासंदर्भात व बजेटचा कायदा लागू करा यासाठी अनेक वेळा त्यांना त्यांच्या मंत्रालयाच्या दालनात भेटून निवेदन दिले आहेत.तसेच त्यांचा सोशल मीडियाद्वारे समाचार सुद्धा घेतला आहे.या शुभेच्छांची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच ते म्हणाले की यापुढील सामाजिक न्यायमंत्र्यांनी जर अशाच प्रकारचे काम केले तर त्यांना सुद्धा वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने आम्ही शुभेच्छा देऊ असे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या दालनात नभेटल्याने नितीन आगे चे वडील पिढीत राजू आगे यांनी दैनिक सम्राट त्यांच्या दालनासमोर लावून सरकारचा निषेध केलेला क्षण

You may have missed