रत्नत्रय मधील बाल दिंडी ने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश *
*रत्नत्रय मधील बाल दिंडी ने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश *
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सालबाद प्रमाणे बालदिंडी चे आयोजन केले होते या बालदिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनाचे संदेश देण्यात आले.
या दिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये झाडे लावा झाडे जगवा,बेटी बचाव बेटी पढाव,स्वच्छ भारत सुंदर भारत असे अनेक संदेश लिहिलेले फलक पताका विद्यार्थ्यांच्या हातात दिले होते.फलकाच्या व घोषणा च्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. तसेच माऊली तुकारामांच्या गजरात टाळ व भगव्या पताका घेवून पारंपारिक वेशभूषेत आषाढी वारी बालदिंडी काढण्यात आली यावेळी संस्थेचे
अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन केले.विद्यार्थ्यांनी
विठ्ठल – रुक्मिणी,संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांचे वेश परिधान करुन लेझीम पथकाने कला सादर केली.
सदर प्रसंगी साल बाद प्रमाणे जगदीश राजमाने यांनी बालवारकऱ्यांना खाऊ वाटप केले.
या सोहळ्यामध्ये रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी संचालक वैभव शहा, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे,बाहुबली दोशी, अजय गांधी, अजितकुमार दोशी,सुरेश धाईजे ,जगदीश राजमाने, तनोज शहा रामदास गोपणे, सुभाष सुदणे, सतीश बनकर वैभव मोडासे,चंद्रकात तोरणे,
पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर राऊत, मुख्यध्यापक शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.