कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केला वाढदिवस साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते येथील कृषी मंडळात कार्यरत असणारे कृषी पर्यवेक्षक पदावर असलेले उदय तुकाराम साळुंखे यांनी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. शासकीय सेवेत असलेले कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय तुकाराम साळुंखे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर व चर्चेत असतात.पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते अनाथ आश्रमामधील विद्यार्थ्यांना भोजनदान,कपडे व खाऊ देऊन वाढदिवस साजरा करतात.तसेच मुलाचाही वाढदिवस त्याच पद्धतीने करत असतात.वाढदिवसाचा आनाठाई खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असतात.अशाच प्रकारे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. तसेच झाडे लावा झाडे जगवा अभियानात भाग घेऊन झाडे जगवण्यासाठी वाढदिवसानिमित्त कुंड्या ही भेट दिल्या.
बोलताना ते म्हणाले की आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व सामाजिक कार्यासाठी मी नेहमीच योगदान देईन अशाच पद्धतीचा समाजातील इतर लोकांनी सुद्धा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून स्वतः पुढे येऊन योगदान द्यावे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.