माऊली बहु . संस्थेने केला सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांचा सत्कार

माऊली बहु . संस्थेने केला सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क विजय कुचे अकोला शहरातील प्रत्येक वस्तीत शासनाने सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध द्यावी तसेच प्रत्येक वस्तीत गरीब असलेल्या नागरिकांना प्राधान्याने शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा यासह इतर समाजोपयोगी उपक्रम राबविले आणि प्रसंगी आंदोलने करणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांची धडपड पाहता त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा यासाठी माऊली बहु . संस्थेने एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला आहे
त्यांच्याच अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर पोलीस प्रशिक्षण केंद्र बँड पथकाच्या द्वारे वादनकला विकसित करून नवयुवकाना प्रोत्साहित केल्याबद्दल महादेव सदांशिव यांचा आणि ,आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या रेखाताई घरडे आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी आनंद इंगळे,मिलिंद बनसोड ,दिलीप सिरसाट,मीनाक्षी तायडे,शोभा वानखडे,शिवना डोंगरे, जयदीप पाळसपगर, गणेश सपकाळ,हेमंत उके, रजनी गवई, निलेश खडसान, कल्पना घुगे,आशीष सोनोने, वैशाली सिरसाट,विजय माला पाईकराव, शीला उके,आकाश इंगळे, दीपक सिरसाट,प्रमोद पांडे,पवन कनोजिया, इर्शाद अहमद, सागर इंगळे ,आकाश वानखडे आदींचा समावेश होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली बहु . संस्थेच्या अध्यक्षा वर्षा गजभिये यांनी केले तर सूत्र संचालन शोभा वानखडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिवानी डोंगरे यांनी केले

You may have missed