नातेपुते रत्नत्रय प्रीस्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन

– रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोरे हॉस्पिटल शेजारी घनवट बिल्डींग येथे सोमवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. आयोजित करण्यात आल्याची माहिती स्कूलचे सभापती व व्यवस्थापक वैभव शहा यांनी माळशिरस लाईव्हशी बोलताना दिली.
या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ.एम.पी.मोरे यांचे प्रमुख उपस्थित कर सल्लागार मयूर शहा व नातेपुते पोलीस स्टेशन सह. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, उपसभापती प्रितम दोशी, सदस्य विनय दोभाडा, अमित शहा, मुख्यध्यापिका माधवी रणदिवे व समस्त प्रशाला समिती यांनी पालक, शिक्षणप्रेमी नागरिका यांनी या बाल कलाकरांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे वतीने २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष विविध उपक्रम राबवीत अनंत अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था साजरे करणार आहे. या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थीच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून बालचमूची बहारदार कला पाहण्यासाठी पालकासह, शिक्षण प्रेमी नागरिक आतुरले आहेत.