मूकनायक पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क- प्रमोद शिंदे
– मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने दिला जाणारा मानाचा मूकनायक हा विधिज्ञ क्षेत्रातील पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड करण्यात आली असून रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी अकलूज येथे होणाऱ्या मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमध्ये आमदार राजू खरे आणि फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे मास्तर यांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने जाहीर करण्यात आले आहे.
ॲड. सुमित सावंत यांनी
सन २०१४ सालापासून माळशिरस येथे दिवाणी, फौजदारी व महसुली क्षेत्रामध्ये वकिलीचे काम सुरु करुन प्रसंगी नाममात्र फी अथवा नि:शुल्क कायदेशिर सहाय्य व अनेक गोरगरीब लोकांना मदत करण्याचे काम केले. तसेच अनेक व विविध सामाजिक संघटना, वर्तमानपत्रे तथा राजकीय पक्ष यांचे अधिकृत कायदेशिर सल्लागार म्हणुन काम पाहीले आहे.
लहान पासुनच वेगवेगळ्या आंदोलनामध्ये उत्सपूर्त सहभाग,
आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असल्याने कुमार वया पासुन सामाजिक कामाची आवड, विविध स्पर्धा आयोजित करुन सामाजिक उपक्रम सादर करणे, भारतीय संविधानाच्या जनजागृतीसाठी सतत प्रयत्न केले आहे. जागर संविधानाच्या अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले.
अतिशय कमी वयामध्ये वकीली क्षेत्रामध्ये नाव लौकीक मिळवुन मोजक्या वकीलांच्या पंक्तीत जावुन चांगल्या प्रकारे वकीली चालवत असताना सुध्दा सामाजिक भान व समाजा प्रती असणारे प्रेम जोपासत सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेवुन सामाजिक कार्य अखंडपणे सुरु ठेवले आहे याची दखल घेऊन मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने पुरस्कार जाहीर केल्याचे म्हटले आहे.