रत्नत्रय प्री स्कूल नातेपुतेच्या बाल चमू चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय धूम धडाक्यात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
. . रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नात्रेय प्री स्कूल नातेपुते, येथे दिनांक १०/३/१५(सोमवार) रोजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम, घनवट बिल्डिंग, मोरे हॉस्पिटलच्या प्रांगणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय डॉक्टर श्री एम पी मोरे (वैद्यकीय अधिकारी) , ॲड. मयूर शहा (कर सल्लागार), नातेपुतेचे ए पी आय महा रुद्र पपरजने साहेब, नगरसेविका शर्मिला चांगण श्री हनुमंत धालपे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास रत्नत्रय परिवारातील रत्नत्रय स्कूल मांडवे चे सचिव माननीय श्री प्रमोद दोशी, रत्नात्रेय प्री स्कूलचे सभापती व वेवस्थापक श्री वैभव शहा, उपसभापती श्री प्रीतम दोशी, संचालक श्री विनय दोबाडा श्री अमित शहा, सुरेंद्र शहा रत्नत्रय पतसंस्थेचे मॅनेजर राऊत सर, रत्नत्रय प्री स्कूल व अकॅडमीचे मुख्याध्यापक (दहिगाव) श्री सतीश हांगे सर, रत्नत्रय आयटीआय दहिगाव चे प्रिन्सिपल ,जगताप सर रत्नत्रय प्री स्कूल माळशिरस च्या मुख्याध्यापिका व वनिता निंबाळकर, रत्नत्रय एज्युकेशन च्या मांडव्याच्या मुखादक दैवत वाघमोडे उप मुख्याध्यापिका सविता दे साई मॅडम, मांडवे येथील शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. नातेपुते गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रौनक चंकेश्वरा , श्री बाहुबली चंकेश्वरा श्री नीलम कुमार गांधी, पत्रकार मनोज राऊत, वैभव आठवले स्कूलचे पालक हितेश सावंत, रोहित गांधी, तुषार देसाई, सुभाष इंगोले, अतुल नाळे, संभाजी अवघडे, रविराज नलवडे, सौ अर्चना गटकुल, सौ निकिता शहा सौ प्रीती दोशी शाहीन मुलांनी, सो आता र, पूजा नलवडे, सौ शीतल पटेल वर्षा नाळे, मनीषा हरनवळ, सीमा सावंत, अंकिता गांधी, संजना चकेश्वरा, असा बहुसंख्य महिला वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात नाविन्य वेद असलेल्या फॅशन शो ने करण्यात आली. यानंतर रत्नोत्तरे प्री स्कूलचे पापा मेरे पापा हा डान्स अंश वी काटवटे या प्ले ग्रुपच्या विद्यार्थिनींनी सादर केला, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारा सोशल मीडियावरील डान्स ,सुनो गोरसे हे देशभक्तीपर गीत तसेच सर्व विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यांचा असलेला एकटी एकटी घाबरलीस ना प्री स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जुबी डुबी या गाण्यावर सर्व बालचंदूनी खूप सुंदर डान्स केला, तर बम बम बोले साठी सर्व मुले आनंदाने नाचली. या कार्यक्रमात दिव्यांशी शहा व निकिता शहा या यांच्या जोडीने सुद्धा अतिशय सुंदर डान्स केला . रुद्रली सावंत या विद्यार्थिनी ने सुद्धा उत्कृष्ट डान्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेपरी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच न्यारी झाली होती. या कार्यक्रमात बक्षीस वितरण सुद्धा घेण्यात आले शाळेत घेतलेल्या स्पोर्ट्स व क्वीज कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण तसेच महिला दिन दिनानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण या समारंभात घेण्यात आले. सर्व विद्यार्थी बक्षीस घेऊन अतिशय खुश झाले होते. तसेच पाककलेतील बक्षीसांसाठी सौ सीमा सावंत-१, सौ अंकिता गांधी-२, सौ सविता इंगोले-३ यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सभापती वैभव शहा यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री सतीश हांगे व मुख्याध्यापिका माधवी रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व रत्नत्रय प्री स्कूलचे सहशिक्षिका पूजा दोशी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कोरिओग्राफी करत सुंदर डान्स बसवले होते.व सर्वाना स्कूल तर्फे नास्ता ची सोय केली होती . वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे सभापती श्री वैभव शहा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.