माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न
नातेपुते (प्रतिनिधी)


माळशिरस येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांची जयंती नालंदा बुध्द विहार ट्रस्ट च्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवात सा.गटशिक्षणाधिकारी करङे, जि प सदस्य बाळासाहेब धाईजे , नुतन कृषी अधिकारी पंकजजी लोंढेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 10 व 12 वी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक मुला मुलींना एक झाङ भेट देण्यात आलं तसेच जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू पहिली ते सातवीतील मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नूतन कृषी अधिकारी पंकज लोंढे, सुहानी पोपट गेजगे या मुलीने पुणे येथे झालेल्या तायकांदो कराटे स्पर्धेत ब्राॅज पदक मिळविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. छत्रपती शाहूमहाराज यांच्या जीवनावर प्रा दिपक धाईजे सर , ङाॅक्टर कुमार लोंढेसाहेब, प्रदिप धाईजे व जि प सदस्य बाळासाहेब धाईजे यांनी मनोगत व्यक्त केले नालंदा बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी केले. या कार्यक्रमास जेष्ठ नेते आबाजी सावंत, अशोकबापु धाईजे ट्रस्टचे अध्यक्ष विकासदादा धाईजे, मिलींद सरतापे ,विशाल साळवे , दशरथ नवगीरे , सरपंच रजनीश बनसोङे , दादा नामदास , रणजीत सातपुते , राम कांबळे , चंद्रकांत कांबळेगुरूजी , रमेश धाईजे , रणजीत सरवदे , ङाॅक्टर राहुल केंगार , मोहन करङे , मिलींद गायकवाड, किरण धाईजे , बुध्दभूषण धाईजे , अतुल धाईजे ,अक्षय जाधव, लखन बेंद्रे ,बुध्दभूषण बनसोङे , तसेच जि प शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रणजीत धाईजे उपस्थित आमच्या आभार व्यक्त केले.

You may have missed