पिरळे येथे शिंदे गट शिवसेना शाखेचे उद्घाटन


नातेपुते (प्रतिनिधी)
पिरळे ता. माळशिरसयेथेशिंदे गट शिवसेनेचे उद्घाटन तालुकाप्रारमुख जकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या निमित्तानेअल्प दरात चणाडाळ डाळ वाटप पाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले शासनाच्या सर्व योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे.पिराळा येथे शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त एका आधार कार्ड वर ५ किलो ६० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शासन आपल्या दारी ही योजना आणून सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे त्याचाच प्रत्येक म्हणून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली. शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात डाळ नागरिकांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये आत्तापर्यंत 75000 पेक्षा जास्त माता-भगिनीने लाभ घेतलेला आहे. त्याचा प्रतिसाद पाहता आपण लवकरच दोन लाखाचा टप्पा सुद्धा गाठू यावेळी माजी सरपंच संदीप नरळे,सरपंच सुनील दडस,पत्रकार प्रमोद शिंदे,वसंत दडस,माजी सरपंच शिवाजी लवटे,माजी उपसरपंच अमोल बापू शिंदे,दत्तू लवटे,दादा लवटे,उमेश खिलारे जिल्हा परिषद गटप्रमुख अनिल दडस पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे उपप्रमुख उमेश जाधव दहीगाव जिल्हा परिषद गटाचे प्रमोद चिकणे नातेपुते नगरपंचायतचे गटनेते दादाभाई मुलानी प्रभाग ७ प्रमुख सनी बरडकर जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत उपाध्यक्ष राजू जाधव सचिव माऊली देशमुख व शेकडो ग्रामस्थ बहुसंख्येने महिला भगिनीउपस्थित होते.