नातेपुतेत श्रावणी भंडारा निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे नातेपुते ता.माळशिरस येथे श्री शंभू महादेव श्रावणी भंडारा उत्सवानिमित्त शंभू महादेव आखाडा येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे. या मैदानाला दोनशे वर्षांची परंपरा असून अखंडपणे हा कुस्ती आखाडा सुरू आहे. दरवर्षी श्रावणातल्या शेवटच्या आदल्या सोमवारी या आखाड्याचे व श्रावणी भंडाऱ्याचे आयोजन नातेपुते येथील ग्रामस्थांकडून केले जाते.या आखाड्यात एक लाख 51 हजार रुपये कुस्ती पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर विरुद्ध पै.माऊली कोकाटे पुणे ,यांची होणार असून,इनाम 1 लाख 21 हजार साठी पै.दादा शेळके पुणे विरुद्ध पै संदीप मोठे सांगली,इनाम 1 लाख रु साठी पै.वैभव मन पुणे विरुद्ध पै.महारुद्र काळे कुर्डवडी,इनाम 75 हजार पै. आदर्श सोरटे नातेपुते विरुद्ध पै.अभिजित भोईर पुणे.तसेच इनाम 75 हजार ते 25,5 ,2, 1 हजार च्या कुस्त्या नेमली आहेत. कुस्त्यांची सुरुवात सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सहा वाजता शंभू महादेवाची पूजा करून करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन उर्फ आप्पासाहेब भांड यांनी दिली. यावेळी निजाम काझी, मामासाहेब पांढरे, नंदकुमार लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बाळासाहेब काळे, रंजीत काळे, बापू अर्जुन, देविदास काळे, अतुल बावकर, नारायण काळे, हनुमंत सरक, सुखदेव दडस, शक्ती पलंगे, व ग्रामस्थ उपस्थित होते.