अतिशय क्षेत्र दहिगाव येथे रथोत्सव व पंचवार्षिक मानस्तंभ 125 वर्षपूर्ती होत्सव उत्साहात संपन्न,

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव व पंचवार्षिक मानस्तंभ 125 वर्ष पूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पंचवार्षिक मानस्तंभ दर्शन पायाड करण्यात आले होते.भाविकांनी कलश घेऊन मानस्तंभाचे दर्शन घेतले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी रथोत्सव मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला.रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांचे मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक  काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून सर्व जाती-धर्माच्या लोकांनी तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार मानवी साखळी करत दोरीच्या साह्याने ओढत नेला.व श्री 108आचार्य  सुयश सागरजी महाराज ससंघ व्यासपीठावर उपस्थित होते.यांच्या सानिध्यात बालब्रह्मचारी रेवती ताई दोशी यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सागरजी महाराज व रेवती ताई यांनी भाविकांना मार्गदर्शन केले.याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चाढाव्यांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या. या कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे,पीएसआय विक्रांत दिघे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक,श्राविका यांनी परिश्रम घेतले.

You may have missed