पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने पिरळेत घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


पिरळे तालुका माळशिरस येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने एन डी एम जे जि प शाळा पिरळे यांच्या वतीने 26 नोव्हेंबर भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे ऍड सुमित सावंत हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली,गावातून संविधान रॅली काढून घरो घरी संविधान उद्देशिका देण्यात आली.तसेच उपस्थित मान्यवरांचा भारतीय  संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात ए पी आय परजणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, केक कापून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.तसेच राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. ए पी आय  महारुद्र परजणे बोलताना म्हणाली की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज हे नावाप्रमाणेच पुरोगामी विचारांचे काम करत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  जगातील सर्वात महान संविधान आपल्याला दिले आहे  भारतीय संविधानाने आपल्याला सर्व अधिकार दिले आहेत.त्यामुळे संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. तसेच एडवोकेट सुमित सावंत यांनी संविधान आणि संविधानाने दिलेले आपणास अधिकार याविषयी मार्गदर्शन केले.माजी उपसरपंच संदीप नरोळे,मा.विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले, संपादक प्रमोद शिंदे,समता दूत किरण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.उद्देशिकेचे वाचन मुख्याध्यापक संजय  ढवळे सर यांनी केले. सूत्र संचालन हनुमंत फुले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.या कार्यक्रमास का संपादक प्रशांत खरात,सरपंच विद्याताई लवटे,ग्रामसेवक हनुमंत वगरे, मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे,महादेव शिंदे,गणेश दडस, पॅंथर जिल्हाध्यक्ष सदस्य दादासाहेब शिंदे,गोरख साळवे, काशिनाथ दडस, अशोक तोडकर,भारत पवार,ग्रामसेवक,विश्वास बनकर,अमोल वाघ,संजय पाटील, मोहन पवार, अध्यक्ष उज्वला बुधवले,आरोग्य सेविका विजय शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता सूर्यवंशी,सीमा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक ढवळे सर, निगडे सर,शेंडगे मॅडम, नामदे मॅडम,जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

You may have missed