नितेश माने वाढदिवसानिमित्त261 जणांनी केले रक्तदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
नातेपुते येथे नितेश माने यांच्या वाढदिवसानिम्मित संयुक्त प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस लोकांचा पार्टी करण्याचा,एन्जॉय करण्याच्या दिवस तरी पण शिना माने यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर 261जनानी रक्तदान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला.या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.रक्तदान 7:30 वाजता संपल्या नंतर ही मित्र परिवार रक्तदान करण्यासाठी येत होताच पण वेळेअभावी त्यांना रक्तदान करता आले नाही.हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी संयुक्त प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.