सहकार महर्षींनी माळशिरस च्या माळरानावर नंदनवन फुलवलं-पद्मजादेवी मोहिते
पाटील-संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे श्रेष्ठ – पद्मजादेवी मोहिते-पाटील
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे उद्देशाने दिनांक सात जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले यामध्ये प्रा. नारायण माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुले- मुली यांच्या कबड्डी, खो-खो आदी क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, गायन, निबंध लेखन, पुष्प सजावट,रांगोळी, हस्ताक्षर, पारंपारिक दिन या सारखे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आटपाडी येथील प्रा शहाजी पारसे यांचे ‘ सहकार महर्षी आणि त्यांचे जीवनकार्य‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले,सामान्य माणसाविषयी त्यांच्या मनात अपार श्रध्दा होती. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ते तत्पर असत. वंचितांचे, उपेक्षितांचे आणि शेतकऱ्यांचे- शेत मजुरांचे जीवनमान उंचावले जावे. त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे या विचाराने ते समाज सेवा करीत राहिले. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अकलूज येथे शैक्षणिक संकुल उभा केले. अनेकांना रोजगार निर्माण व्हावा शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती साधता यावी यासाठी त्यांनी दूध संघ, कुकुटपलान, जर्सी गायी छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते म्हणाले
माळशिरस च्या माळरानावर सहकार महर्षींनी नंदनवन फुलवलं तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी समाजकार्य वा राजकारण करताना भेदभाव कधी केलानाही.
सहकार महर्षी यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, या हेतूने तालुक्यातील सर्व संस्थांची सहकार तत्त्वावर उभारणी केली. आज त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज आहे, असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयात सहकार महर्षीच्या १०७ व्या जयंतीनिमित्त बोलताना
ते पुढे म्हणाले, महर्षींनी राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने त्यांचे राजकारण होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुनील राऊत, निनाद पाटील, एन. के. साळवे, समीर सोरटे, अभिमन्यू आठवले, मनोज राऊत, सुनील गजाकंस,श्रीकांत बाविस्कर,, सुनील ढोबळे, संजय पवार , या सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ , डायरी पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार प्रमोद शिंदे यांची द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निनाद पाटील, सुनील राऊत आपल्या मनोगतातून सहकार महर्षी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
प्र प्राचार्य डॉ रज्जाक शेख, डॉ दत्तात्रय साळवे आणि विद्यापीठ सुवर्णपद विजेता अजय कुंभार यांचा विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक विभागातील प्रा नितीन देशपांडे, प्रा सौ पुष्पा सस्ते, प्रा सौ रब्बाना शेख, प्रा. दयानंद साठे, प्रा राजेंद्र साठे, प्रा. उत्तम सावंत, प्रा जगदीशचंद्र मुळीक, प्रा श्रीकांत पवार,प्रा डॉ बाळासाहेब निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ रज्जाक शेख यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे यांनी केले तर प्रा. सुहास नलवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.