*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*
*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- दहिगाव तालुका माळशिरस येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने दहिगाव मध्ये बाहेर गावाहून आलेले मजूर परंतु काम नसलेने अडकुन पडले आहेत त्यांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू श्री विजय पाटील , भारत गॅस एजन्सी मालक यांचे वतीने देण्यात आले यावेळी सरपंच ॲड रणधीर पाटील, तलाठी समाधान पाटील , पोलीस पाटील विठ्ठल मोरे , नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक माने उपस्थित होते. वाटप करते वेळेस सोशल डिस्टन्स इन चा नियम पाळून वाटप करण्यात आले.