अनंतनागमध्ये सुरक्षा दलांची चकमक; २ दहशतवादी ठार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागम ध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. श्रीनगरच्या खानयार भागातही अशाच प्रकारची चकमक सुरु आहे. या घटनेच्या काही तासांनंतर अनंतनागमध्ये चकमक सुरु झाली.दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची चौथी घटना या भागात काही दहशतवादीलपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची ही चौथी घटना आहे.