प्रमोद शिंदे

पोस्को ,बलात्कार, ॲट्रॉसिटी मध्ये आरोपीस तिहेरी जन्मठेपेची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -अल्पवयिन मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी अरोपीस तिहेरी जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयिन मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी अरोपीस तिहेरी जन्मठेपेची शिक्षा* *ॲट्रॉसिटी मध्ये सुद्धा जन्मठेपेची शिक्षा


    नांदोरे ता पंढरपूर येथील एका गरीब कुठूबातील अल्पवयिन मतिमंद मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी याने बलात्कार केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी आज पंढरपूर न्यायालयाने आरोपी नारायण कदम यास तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

    2016 मध्ये पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावी ही घटना घडली होती.करकंब पोलिस स्टेशनचे प्रभारी तत्कालीन सपोनि दीपक पाटील हे होते.याबाबत करकंब पोलिसात अरोपी विरोधात पोक्सो,बलात्कार व अॅट्रासिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचा तपास तत्कालीन पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पिंगळे यांनी केला होता.त्यानंतर आता पंढरपूर न्यायालयाने आरोपी कदम यास 16 हजार रु.दंड व तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.सरकारी वकील म्हणून अॅड सारंग वांगीकर यांनी काम पहिले.

उद्यापासून सरकारी बँका सलग 3 दिवस बंद

उद्यापासून  सरकारी बँका  सलग 3 दिवस बंद*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -संपामुळे (strike) सरकारी बँका (Government bank) उद्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद (Closed) राहणार आहेत. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (३१ जानेवारी) आणि शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी संप पुकारला आहे. २ फेब्रुवारीला रविवार आहे. त्यामुळे सलग ३ दिवस सरकारी बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.

 इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (United Forum of Bank Unions) ने दोन दिवसीय संप (strike) पुकारला आहे. १ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र बँक कर्मचारी (Bank employee) संपावर ठाम आहेत. बँक कर्मचारी संघटनांनी १२.२५ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) ने फेटाळून लावली आहे. याशिवाय विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा या मागण्या सरकारने फेटाळल्या आहेत. त्यामुळे  बँक कर्मचारी संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी ३ दिवस संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते.

इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.

तांबेवाडी येथे जिवंत तरस वनविभागाच्या ताब्यात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तांबेवाडी येथील शिवारात जिवंत जखमी तरास वनविभागाच्या ताब्यात मिळाला असून

जखमी तरस  उपचारासाठी सोलापूरला रवाना करण्यात आला आहे

शिकारीसाठी वापरणाऱ्या सापळ्याचा गूढ कायम

माळशिरस… तालुक्यातील तांबेवाडी ( ता माळशिरस ) येथील शिवारात कॅनॉल च्या पाणी सोडण्याच्या दारातील मोरीमध्ये जखमी अवस्थेत तरस आढळून आला ग्रामस्थांनी वनविभागाला कळवताच तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी आय ए एच शेख आपल्या पथकासह पोहोचले तातडीने परसावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून सुरक्षित पिंजर्‍यात पकडण्यात आले. मात्र या रसाच्या पायाला असलेल्या शिकारी सापळ्यामुळे  या प्राण्याची ची शिकार करण्याच्या उद्देश असल्याचे  लक्षात आले त्यामुळे वन विभागाने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी तरस सोलापूर प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

                    एक वर्ष वयाचा तरस हा प्राणी या परिसरात फिरत असताना  शिकारी सापळ्यात  मध्ये त्याचा पाय अडकल्यामुळे तो जखमी अवस्थेत आढळल्याची माहिती तांबेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दादा चव्हाण यांनी वन विभागाकडे दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आय ए एच शेख, वन परिमंडळ अधिकारी एस एस क्षीरसागर, वनरक्षक एच व्ही साळुंके, सचिन जोशी यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. व जय क्षीरसागर, ज्ञानेश्वर बोडरे ,सुमित बजबळकर ,अजय होळ ,तानाजी बोडरे आनंद दहिवाळ आदी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी तरस पिंजऱ्यात बंद करण्यात आले यानंतर उपचार केले असून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या प्राणिसंग्रहालय आकडे पाठविण्यात आले.आसुन या बाबत  वन विभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन्यजीव अधिनियम 1972च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

विशिष्ट पद्धतीच्या शिकारी सापडल्याचे गुढ कायम

जखमी रसाच्या पायामध्ये विशिष्ट प्रकारचा शिकारी सापळा सापडला असून हा सापळा प्रामुख्याने हिंस्र प्राण्यांच्या शिकारीसाठी मराठवाडा विदर्भात वापरला जातो हा सापळा माळशिरस तालुक्यात यात वापरात आल्यामुळे या प्रकाराचे गूढ वाढले आहे कारण या परिसरात कोणतेही प्राणी आढळत नाहीत या भागात काही ठिकाणी हरणांचे अस्तित्व असले तरी हा सापळा त्यांच्या शिकारीसाठी उपयुक्त ठरत नाही त्यामुळे हा सापळा प्रथमच या भागात आढळून आला असून वन विभाग याची कसून तपासणी करीत आहे मात्र अद्याप तरी या प्रकाराचे गूढ वाढले आहे.

मोबाईलचा दुरुपयोग थांबवा: डॉ. समीर दोशी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मांडवे:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी हा दिवस रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली.
यानंतर अकलूजचे सुप्रसिद्ध डॉ. मा. श्री समीर अशोककुमार दोशी व सौ. वैशाली समीर दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत,देशभक्तीपरगीत सादर करण्यात आले. त्यानंतर ढोल तशाच्या तालावर संगितमय ,आकर्षक अशी विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली . रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा ) दोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2019 -20 या वार्षिक स्नेहसंमेलनातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या गीतातील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यानंतर इंग्लिश मेडियम ,सेमी व प्री-प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.या प्रसंगी बोलताना चेअरमन प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला.व पुढे प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शांतता, समता , बंधुता ही मूल्ये आपल्या जीवनामध्ये जोपासण्याचा संदेश दिला. व राज्यघटनेच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित सर्व समुदायास केले.
मा.डॉ.श्री समीर दोशी म्हणाले “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि मैदानी खेळवरती लक्ष केंद्रित करावे.पुढे त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.तसेंच रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले “आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने कौतुकाने उत्साहाने साजरे करतो त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी हा राष्ट्रीय सण सुद्धा साजरा करतात. त्यांनी पुढे देशहिताचे विचार आंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रहित हे प्रत्येक भारतीयांनी आपल्या हृदयी जोपासण्यासाठी वचनबद्ध होण्याचे आव्हान केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत क्रमांक आल्यास विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

सदर प्रसंगी सौ. मृणालिनी दोशी, डॉ. वैशाली दोशी, सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष श्री महावीर शहा नातेपुतेचे प्रतिष्ठित व्यापारी अतुल मेघचंद्र दोशी, अभयकाका दोशी, विराग गांधी ,सागर दोशी, श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री प्रमोद दोशी , उपाध्यक्ष तुषार गांधी, संस्कृतीक व क्रीडामंत्री डॉ. श्री निवास गांधी, रोनक चंकेश्वर ,वैभव शहा ,संजय दोशी, दत्ता भोसले, रामभाऊ गोफणे, सतीश बनकर , भाग्यश्री दोशी, रेश्मा गांधी, पार्वती जाधव, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर देशपांडे सूत्रसंचालन श्री सतीश हांगे सर व आभार प्रदर्शन दैवत वाघमोडे सर यांनी केले

वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने नातेपुते कडकडीत बंद

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  नातेपुते -(प्रतिनिधी) नातेपुते तालुका माळशिरस येथे NRC/CAA/CAB/NPR च्या विरोधात  नातेपुते  कडकडीत बंद ठेवण्यात आला NRC/CAA/CAB/NPR कायदा व केंद्र सरकारच्या जाहीर निषेधार्थ व तसेच  देशाची आर्थिक स्थिती  ढासळत असून  देश दिवाळखोरीच्या  उंबरठ्यावर  येऊन  ठेपला आहे केंद्र सरकारच्या  चुकीच्या आर्थिक धोरणामुळे  देशाच्या तिजोरीत पुरेसा निधी  जमा झालेला नाही  केंद्र सरकारने  देशाचा  रिझर्व फंड  वापरण्यास सुरुवात केली आहे  त्याविरोधात माा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बंद पाळण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर नातेपुते शहर पूर्ण दिवसभर बंद होते त्या बंद मध्ये   बंदची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात करण्यात आली. तसेच शहरातून मोर्चा काढण्यात आला तसेच मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती , विद्यार्थी परिषद, मुस्लिम समाज नातेपुते ,यांनीही या बंदला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी  वंचित बहुजन आघाडीचे  सर्व कार्यकर्ते  सह रोहित नवगिरे,सलमान शेख, धर्माअशोक सावंत ,अप्पा सावंत ,प्रितम साळवे ,नागेश कोणगटांरेकर ,हनुमंत सोरते,संदेश पवार ,महावीर साळवे, बबलू रणदिवे नईम काझी ,जाकीर शेख, मुलानी ,सिकंदर मुलानी ,निजाम काजी ,समीर सोरटे, हयाद शेख,फिरोज फरास,शब्बीर मुलाणी मुदतसर शेख अल्ताप पठाण शिवाजी सावंत, रामभाऊ सावंत, अतुल साळवे, आकाश सोरटे, रामा सोरटे,तुकाराम सोरटे, अरविंद खरात, दादा प्रतापये, तसेच शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी होते.

न्यायसहायक जागृती कार्यक्रम- २०२० ला उत्स्फुर्त प्रतिसाद

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई): न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र शासनचे प्रभारी संचालक आणि शासकीय रासायनिक विश्लेषक डॉ. कृ. वि. कुलकर्णी यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या न्यायसहायक जागृती कार्यक्रम-२०२० या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी केलेल्या आवाहनास मान्यवर अधिकाऱ्यांसह जनतेचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.
राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई येथे मुख्यालय असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तसेच चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथे लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील प्रयोगशाळांमध्ये समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पध्दतीने विश्लेषणाचे कार्य केले जाते. अलीकडच्या काळात गुन्हेगारांमध्ये गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्रीचा वापर होत असून त्या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालांवर रासायनिक विश्लेषण करून सामाजिक हिताच्या दृष्टीकोनांतून तपासी यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करून देणेकामी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची महत्वाची भूमिका आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील विश्लेषणात्मक कार्याची माहिती प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे दि. २१/०१/२०२० व दि. २२/०१/२०२० या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेदरम्यान न्यायसहायक जागृती कार्यक्रम-२०२० चे आयोजन करण्यात आले होते. तर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर आणि लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथे दि. २०/०१/२०२० ते दि. २४/०१/२०२० या कालावधीत आयोजन केले आहे. सदरच्या न्यायसहायक जागृती कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, पोलिस तपासी अधिकारी व अभियोग न्यायालयासंबंधी असलेल्या अभियोक्ता यांनी त्यांच्या प्रमुखांच्या पूर्वसंमतीने तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या शिक्षणार्थींना त्यांच्या महाविद्यालयामार्फत/विद्यापीठामार्फत पूर्वसंमतीने त्या त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात आले होते. या जागृती प्रदर्शनाकरिता अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार, पोलिस, वकील, अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावली अशी माहिती शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेचे विधी विभाग प्रमुख डॉ.केवल उके यांनी दिली.

एस.एम.पी.कॉलेज नातेपुते येथे सहकार महर्षी जयंती महोत्सव संपन्न*

*एस.एम.पी.कॉलेज नातेपुते येथे सहकार महर्षी जयंती महोत्सव संपन्न*नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते ता.माळशिरस येथील सहकार महर्षी शंकराव मोहिते-पाटील कॉलेजात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहासकार प्रशांत सरूडकर व पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकराव मोहिते-पाटील तसेच कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्रशांत सरूडकर सर बोलताना म्हणाले की सहकार महर्षीनी साखर कारखाना उभा करण्यासाठी अतिशय धडपड केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पुढे बोलताना म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.विद्यार्थ्यांनी बहु रंगी व्हायला हवे तसेच विद्यार्थ्यांचे तीन भाषेवर  प्रभुत्व असायला हवे . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कोळेकर सर ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत यांनी मनोगत व्यक्त केले व विविध व्यवसायात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, फुल सजावट स्पर्धा,नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कला सादर केली यावेळी इतिहासकार प्रशांत सरुडकर,प्राचार्य चंद्रकांत कोळेकर, ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, आनंद लोंढे, सुनील गजाकस,अभिमन्यू आठवले, आनंद जाधव, प्रमोद शिंदे,उमेश पोतदार,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक खंदारे सर यांनी केले आभार सावंत सर यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न

आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न
  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे )-मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुरी तालुका माळशिरस येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वाय .व्ही .माने ग्रुप चे श्रींकांत दादा माने यांच्या सहकार्याने घेण्यात आली या स्पर्धेला आमदार यशवंत (तात्या ) माने चषक 2020 असे नाव देण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन  पत्रकार प्रमोद शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात  स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मैदानावर श्रीफळ फोडून करण्यात आले . यामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पथनाट्य लेझीम स्पर्धा गायन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी पंढरपूर, इंदापुर, व पंचक्रोशीतील स्पर्धकांनी  भाग घेतला होता. इंदापूर व पंढरपूर  येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती व शेतकऱ्यांची सद्यस्थिती व सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले या स्पर्धेत  प्रथम क्रमांक एस बी पाटील इंजीनियरिंग कॉलेज इंदापूर, दुतिय क्रमांक सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर ,लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक मोरची विद्यालय, दुतिय क्रमांक प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी, यांनी पटकावला, छोटा गट लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक एकशिव, दुतिय क्रमांक हनुमान वाडी कुरबावी यांनी पटकावला  स्पर्धे साठी यशवंत विठ्ठल माने कन्ट्रक्शन ग्रुप यांनी  विशेष सहकार्य केले तसेच एकशिव, शिवपुरी येथील माध्यमिक व प्राथमिक  शाळेतील विद्यार्थ्यांनी  नयना दीप असा लेझीम खेळ सादर केला यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे, एकशिव गावचे चे माजी सरपंच शहाजी दादा धायगुडे, पत्रकार प्रशांत खरात, वाघमोडे सर, झोडगे सर, शिंदे सर, प्रेम देवकाते,कसबे सर, साळवे मॅडम, शैलेश नारोळे आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन निखील जानकर  यांनी केले होते  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  येथील  मित्र  मंडळ  यांनी विशेष परिश्रम घेतले.

न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेचे सात दिवसीय निवासी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (मुंबई) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एस तर्फे सात दिवसाच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन पँराडाईम फॉर्म हाऊस गोंडले तालुका सुधागड पाली जिल्हा रायगड येथे करण्यात आले होते.
एन एस एसचे एकूण 30 विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांनी दरवर्षी प्रमाणे अनेक कार्यक्रम राबविले जसे ग्रामीण स्वच्छता अभियान आरोग्य पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण शिक्षण प्रचार आणि प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन विद्यार्थी विकास सार्वजनिक वाचनालयाची स्थापना वनराई बंधारा बांधकाम सायबर सिक्युरिटी अवेरनेस प्रोग्राम निविध पथनाट्य व्यसनमुक्ती लसिकरण जागृकता इ.विद्यार्थ्यानी नांदगाव येथे वनराई बंधारा बाधला कृषी अधिकारी श्री गजानन अाव्हाल यांच्या मार्गदर्शनाने 300 गोणी रेती आणि माती भरून विद्यार्थ्यांनी हा बंधारा पूर्ण केला. सर्व विद्यार्थ्यांनी आणि कार्यक्रम अधिकारी डॉ केवळ उके यांनी जीवतोड मेहनत करून हा बंधारा बांधला. गायी गुरांसाठी गावातील लोकांसाठी पाणी साठवून रहावे आणि पावसाळ्यातील पाणी साठविण्यास मदत हवी या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला.
आरोग्य संबंधित विचार करता न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे पाऊल उचलले गर्भवती महिलांसाठी आवश्यक माहिती गोवर रूबेला वर उपाय लसिकरणाबंध्दल माहिती दिली आणि महत्वाचे म्हणजे टिबी यासारख्या आजारावर उपाय आणि त्यांची माहिती पथनाट्यद्वारे देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली नांदगाव येथे सर्वे करून माहिती गोळा केली आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राशी संपर्क साधला. सार्वजनिक ठिकाणी माहितीपुस्तिका वाटणे पथनाट्य संभाषणाव्दारे विद्यार्थ्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
आणि लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहिली मानकर आरोग्य सहाय्यक सौ स्वप्नजा देशमुख आरोग्य सहाय्यक श्री यशवंत वारगुडे विभागीय पर्यवेक्षक महेश भोसले आणि सुधागड तालुक्यातील सर्व आशा सेविका विद्यार्थ्यांनी नांदगाव पाली गोंडाले बावळोली भार्जेवाडी कातकरवाडी दांडवाडी दिघे दिघेवाडी इ. गावात सार्वजनिक कार्यक्रम केले. पालीममध्ये टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी आणि जनरल हायजिन या विषयावर माहिती दिली. नांदगाव येथे सर्वे करण्यात आला स्वस्त आहात तर मस्त आहात सौ साक्षी वैशमपयन यांच्या मार्गदर्शनाने हा सर्वे करण्यात आला. मॅडमनी विद्यार्थ्यांना हवी ती मदत केली आणि हा सर्वे यशस्वीरित्या पूर्ण केला. अशाप्रकारे न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे कार्य गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे याचे पुर्ण श्रेय या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांना जाते. तसेच एन एस एसचे प्रतिनिधी आकांक्षा कुमारी शंतनु गडाले व ओमराजे पाटील यांनी देखील या कार्यात मोलाचे योगदान दिले

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करन्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वैभव गीते यांची मागणी

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करन्याची मागणी नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली

पूर्व महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई )मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीतेंनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधीत अधिनीयम 2015 च्या नियम 16 नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात दोन म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये राज्य पातळीवर उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे मुख्यमंत्री महोदयांनी या समितीची स्थापना करून तात्काळ उच्चअधिकाऱ्यांची बैठक बोलावून राज्यात बौद्ध,दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्यावर वाढलेल्या अत्याचाराचा आढावा घ्यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,खूण बलात्कार जाळपोळ प्रकरणातील पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अत्याचारांचे प्रमाण जास्त असणारे जिल्हे अत्याचार प्रवण घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेबांकडे केली आहे.