धनगर आरक्षण ना ला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध
धनगर आरक्षण ना ला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध
मुंबई येथे चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशना दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क -आमदार व महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षणा बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात मध्ये विधान भवन मध्ये जात असताना प्रशासनाने त्यांना गेट वरती आडवून धनगराचे भूषण असणारा ढोल हिसकावून घेतला व त्यांना धक्काबुक्की करण्यात आली याचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी नायब तहसीलदार तूषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब सरगर सोपान नारनवर बाळासाहेबवावरेे नागेश वाघमोडे युवराज वाघमोडे दादासाहेब खरात गणेश वगरे आदी मान्यवर उपस्थित होते
या निवेदनामध्ये महा विकास आघाडी सरकारने पुर्वी लागू केलेल्या महामेश शेळी मेंढी खरेदी योजनेसह 22 योजना देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केल्या होत्या व धनगराच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती त्यापैकी एक रुपया या सरकारने खर्च केला नाही व धनगर आरक्षणा बाबतीमध्ये एक वर्षांमध्ये एक बैठक अथवा एक चकार शब्द सुद्धा काढला नाही याचा निषेध म्हणून हे निवेदन देण्यात आले यापूर्वी भाजप सरकार सत्तेमध्ये असताना अजित पवार जयंत पाटील धनंजय मुंडे हे धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात मध्ये विधान भवनामध्ये प्रवेश करून निवेदन दिले परंतु त्यांना त्यावेळी प्रशासनाने आडवले नाही आज मात्र गोपीचंद पडळकर यांची अडवणूक करून हे सरकार धनगर समाजाची जाणून-बुजून जाणून-बुजूवन अडवणूक करत असल्याचे दिसत आहे















