माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी पिरळे सरपंच अलका नरोळे यांच्याकडून मुलींच्या नावे पाच हजाराची एफडी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
–महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरळे ग्रामपंचायतीच्या वतीने पिरळे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिरळे येथे डॉक्टर मॉम फाउंडेशन यांच्या प्रेरणेतून सरपंच अलका रामलिंग नरोळे व संदीप नरोळे यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत म्हणून त्यांच्या कार्यकाळात जन्माला आलेल्या सर्व मुलींच्या नावे पाच हजार रुपये ची एफडी केली जाणार आहे.त्याचे चेक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच विधान परिषद आमदार रंजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून खिलारे वस्ती व पवार वस्ती येथे हायमस्ट लॅम्प बसवण्यातआले होते.त्याचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील,पंचायत समिती मा.उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व मान्यवरांच्याा हस्ते करण्यात आले तसेच गावच्या विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले.पिरळे येथे कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी, वीज कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक स्टाफ, कृषी विभाग कर्मचारी,पशुवैद्यकीय कर्मचारी तसेच यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन तसेच पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास पंचायत समिती माजी उपसभापती किशोर सुळ,बँक ऑफ इंडिया वालचंदनगर शाखाधिकारी आशिष आनंद, पंचायत समिती सदस्य हनुमंत पाटील, प्रा.आ.केंद्र फोंडशिरस डॉ.किर्ती सिंह पाटील,वीज महावितरणचे प्रमोद सोनवणे साहेब,दत्ता रुपनवर,भाजपा नेते संतोष महामुनी,सरपंच अलका नरोळे,उपसरपंच उमेश खिलारे,कळंबोली सरपंच संतोष शिरतोडे, माजी सरपंच ,संजय वाघमोडे,महादेव शिंदे, दत्ता वारे, पिनू पाटील,पिरळे ग्रामपंचायत सदस्य सुनील दडस,ग्रामसेवक रमेश जमदाडे, दत्तात्रेय लवटे,भारत पवार,प्रमोद डूडू, राजू नरोळे,मुख्याध्यापक शंकर शिंगाडे,प्रल्हाद साळवे ,सुनील बनकर व ग्रामस्थ मोठ्याा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते उद्योजक संदीप शेठनरोळे यांनी केले सूत्रसंचालन अजित खंडाळे तर आभार उमेश खिल्लारे यांनी व्यक्तत केले.