केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून वृक्ष देऊन नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतिक आढाव यांचा सन्मान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून वृक्ष देऊन नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतिक आढाव यांचा सन्मान करण्यात आला.


वृक्ष देण्याचे कारण जसे वृक्ष वाढते तसेच नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतीक आढाव नायब तहसीलदार पासून पुढील सर्व सर्वोच्च पदे घ्यावे व यातून स्वच्छ आणि सुंदर कामकाज जशा वृक्षाच्या सावलीप्रमाणे व वृक्षाप्रमाणे नागरिकांना न्याय देण्याचे काम करावे , म्हणून केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रतिक आढाव यांचा सन्मान वृक्ष देऊन फलटण येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आला.
प्रतीक आढाव हे अतिशय हलाखीच्या परिस्थिती माध्यमातून शिक्षण पूर्ण केले आहे आणि ते आज नायब तहसीलदार झाले आहेत. अशा तहसीलदाराच्या माध्यमातून युवा तरुण पिढी सर्व स्तरातून घडली पाहिजे म्हणून कित्येक वेळा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची ओळख की गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करणारे नेते वैभवजी गीते यांनी प्रतिक आढाव यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर त्यांचा सत्कार करण्याचे काम केले आहे. म्हणूनच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून आज फलटण येथे भव्य सत्कार केला आहे .

वृक्ष देण्याचे कारण सर्वांनी यापुढे पुष्गुच्छ न देता पुष्पहार न देता वृक्ष देण्यात यावे. या वृक्षाच्या माध्यमातून सर्व लोकांना ऑक्सिजन व सावली निवारा किंवा फळे, फुले अशा गोष्टी मिळू शकतात आणि ते नागरिकांच्या फायदेशीर आहेत म्हणूनच ज्या वेळेस सन्मान करण्याचे असते त्या वेळेस केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ पुष्पहार न देता वृक्ष देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांचा सन्मान किंवा कोणत्याही व्यक्तीचा सन्मान करण्याचे काम करीत आहे. जसे की या वृक्षाप्रमाणे प्रतीक आढाव यांनी सर्व लोकांसाठी न्यायाचे काम करावे म्हणून हा सन्मान करण्यात आला, नक्कीच प्रतीक आढाव या वृक्षाच्या सावली प्रमाणे नागरिकांचे काम करतील असे बोलले आहेत . केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू दळवी राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पवार सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांच्या माध्यमातून आज फलटण या ठिकाणी प्रतीक आढाव यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सचिन मोरे ,महाराष्ट्र राज्य प्रवक्ता सुभाष जाधव, महाराष्ट्र राज्य संघटक हिंदुराव गायकवाड, सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी भोसले, सातारा जिल्हा जनसंपर्क अधिकारी अजय अहिवळे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत सोनवणे ,सातारा जिल्हा सदस्य नीलकुमार गोरे फलटण तालुका शहर अध्यक्ष अयाज्ज शेख, फलटण तालुका संपर्कप्रमुख धीरज जगताप ,फलटण तालुका सदस्य निलेश आवटे, सह पदाधिकारी उपस्थित राहून नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांचा सन्मान वृक्ष देऊन करण्यात आला.























































