रशिया युक्रेन संघर्ष वाढलेले इंधन व खताचा किमंती व त्यावरील उपाय !! – कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे
रशिया युक्रेन संघर्ष वाढलेले इंधन व खताचा किमंती व त्यावरील उपाय !! – कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
आज आपन सर्व शेतकरी बांधव शोशल मेडीया वर्तमान पत्र न्युज चॅनेल चर्चा मध्ये अनुभवतोय की इंधन वाढ व रशिया युक्रेन संघर्ष मुळे खताचा तुटवडा भासणार किमंती गगनाला भिडणार ह्या बाबी आपले नियंत्रणा बाहेरील आहेत पण या वर आपणाकडे बरेच उपाय व पर्याय उपलब्ध आहेत .

जागा मर्यादित

रासायनिक खते सहज उपलब्ध होती व ती वापरणे सोपे होते परंतू प्राप्त परिस्थिती उपलब्ध साधनसामुग्री व उपलब्ध बाबी चा वापर करून पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे . आज मिथीस पीक अन्नद्रव्ये उपलब्धता साठी खालील पर्याय उपलब्ध आहेत याचा वापर करणे गरजेचे आहे . हिरवळीचे खत उदा :ताग धैंचा बोरू चवळी गवार सुबाभूळ करंज पानाचा वापर करणे . ऊस पाचट कल्चर चा वापर ‘ कंपोस्ट ‘ शुगरफॅक्टरी प्रेस मड केक ‘ व कंपोस्ट ‘ विविध प्रकारच्या पेंडी ‘ मासळी खत ‘ गांडूळ खत कोंबडी खत ‘लेंडी खत ‘सिटी कंपोस्ट पशुपक्षी विष्ठा मुत्र ‘ मानवी विष्ठा मुत्र ‘ व्हर्मीवॉश शहरी अथवा मानवी वस्ती सांडपाणी बोनमील ‘ फिश मिल ‘ नाडेफ कंपोस्ट इएम द्रावन, अझोला ‘ केफ्र द्रावन ‘ निळे हिरवे शेवाळ ‘ दशपर्णी अर्क ‘ व्हर्मीवॉश ‘ जीवामृत बीजामृत अमृतपाणी ‘ गोमुत्र शीग खत खुरांचे खत, भुईमुग पेंड ‘करडई पेंड, एरंडी पेंड करंजपेंड निमपेंड मोहाचीपेड रकताचे खत गव्हाचे काड बाजरीचे सरमाड तुरकाड्या सुर्यफुल काड्या भाताचे तुस कापुस काड्या फुले येण्यापूर्वीचे सर्व प्रकारचे गवत ‘ बाबुचा पाला ‘ शेतातील पालापाचोळा खत ‘ केळी पाने व बुधा खत, लिंब जगली झाडे शेवगा आंबा पालापाचोळा खत नारळ व सर्व प्रकारच्या झाडया चे फांद्या कुजविलेले खत शेत तलाव मस्त्य पालनाचे पाणी ‘ जीवाणू संवर्धने जी हवेतील नत्र व जामिनितील स्कुरद व पालाश उपलब्ध करून देता ती अझीटोबॅक्टर रायझोबीएम असिटोबॅक्टर के. एसबी पी एसबी अशा १२ प्रकारच्या बॅक्टेरिया इत्यादी तसेच बाजारात उपलब्ध असलेला द्रवरूप युरिया ‘ फॉस्फरिक अँसीड . उपलब्ध असलेली विविध ग्रेड मधील द्रवरूप खते ‘ सोडीयम क्लोराईड जीप्सम इत्याचीचा उपलब्धता निर्मिती चा वापर करून आपन सर्व पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन समाधानकारक रित्या करू शकतो . म्हणून शेतकरी बंधूनी गोधळून न जाता विचारांचे वादळ थांबवून उपलब्ध साधने व साधनसामुग्रीचा वापर केला तर निसर्गाशी प्राणी पशुपक्षी मानव सुक्ष्म जीव यांचे बरोबर जिओ जीवस्य जीवनम !!या उक्तीप्रमाणे पीक उत्पादन घेता येईल यात काय शंका नाही .















































