आंतरराष्ट्रीय

रत्नत्रय शैक्षणिक संकुलमध्ये इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)- रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शुक्रवार दिनांक 11मार्च 2022 रोजी शैक्षणिक वर्ष 2021- 2022 मधील इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी,मार्गदर्शक विरकुमार दोशी ,सचिव श्री.प्रमोद दोशी,श्री.देविदास ढोपे ,श्री. रामदास कर्णे,चंद्रकांत तोरणे,श्री.सुहास काळे,श्री.स्वप्नील भोसले मुख्याध्यापक श्री.श्रीकृष्ण पाटील ,श्री.दैवत वाघमोडे ,सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.अनंतलाल दोशीयांनी स्वीकारले.
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख आथितींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला . चि.रवींद्र काळे,प्रथमेश जाधव,कु.नम्रता मोरे,रिया दोशी,स्नेहल नारनवर,रेणुका मोहिते,जास्मिन,मुलांनी,गायत्री मोघे,साक्षी पालवे,प्रतीक्षा शेंडगे या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले ,
संस्थेचे सचिव श्री.प्रमोद दोशी यांनी हा निरोप समारंभ नसून हा शुभेच्छा समारंभ आहे असे म्हटले, विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून आर्ट्स आणि कॉमर्स संस्थेमध्ये सुरू करणार असल्याचे सांगितले .विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी विद्यालयाचे नाव उज्जवल करतील अशी आशा व्यक्त केली व विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी आजच्या कार्यक्रमामुळे त्यांना त्यांच्या इयत्ता 11 वीच्या वर्गाची आठवण झाल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .अश्याप्रकारे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माधवी रणदिवे प्रास्ताविक श्री.दैवत वाघमोडे व आभार प्रदर्शन श्री.विरकुमार दोशी यांनी केले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा तसेच विविध क्षेत्रात ल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – नातेपुते येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या  वतीने नूतन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आयुक्त जयंती महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर साहेब, उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख, माजी सरपंच विद्यमान नगरसेवक बी वाय राऊत, अमरशील देशमुख, अविनाश भाई दोशी,रणजीत पांढरे, नंदू लांडगे,भैय्यासाहेब सोरटे,उद्योजक संदीप सेठ नरोळे ज्ञानेश्वर उराडे राडे,तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण चे सहाय्यक अभियंता प्रमोद सोनवणे,दीपक कंकाळे,मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे आदी मान्यवर होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी

नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे बोलताना म्हणाल्या की नातेपुते नगरीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असेल.

उपनगराध्यक्ष मालोजीराजे बोलताना म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र हेनेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांच्या कामात पॉझिटिव्हिटी नेहमी असते.तसेच एपीआय मनोज सोनवलकर पूर्वी महाराज न्यूज ने चांगला उपक्रम राबवला आहे, ज्ञानदीप संस्थेचे संचालक सी.डी ढोबळे सर, संदीप नरोळे अविनाश दोशी, अप्पासाहेब करचे, रंजीत पांढरे यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे कौतुक करत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता दीपक कंकाळे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या

तसेच पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड झाल्याबद्दल व सलीम मुलानी यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पोस्टमन सरवदे यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास संभाजी फुले सर,अकबर मुलानी सर,खरात सर,प्रमोद डूडु, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे पत्रकार अभिमन्यू आठवले, सचिन रणदिवे शक्ती भैय्या पलंगे, जमीर मुलानी सचिन झेंडे, सलीम मुलानी, संतोष चव्हाण,राहुल कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र चे संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक कांबळे प्रज्ञा मोरे खरात डेकोरेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पिरळे येथील समता विद्यालयस गट विकास अधिकारी खरात यांची सदिच्छा भेट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते( प्रतिनिधी)पिरळे ता माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय व श्री भिवाई देवी ज्युनिअर कॉलेज पिरळे प्रशालेस माळशिरस तालुका गट विकास अधिकारी खरात साहेब व विस्तार अधिकारी कोळेकर यांनी अचानक सदिच्छा भेट दिली.
यावेळी समता माध्यमिक विद्यालय चे चेअरमन महादेव शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामपंचायती च्या वतीने शाळेच्या क्रीडांगण वर वृक्षारोपण करण्यात आले.प्राचार्य दीपक शिंदे बोलताना म्हणाले की प्रशाले साठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या वतीने नेहमी सहकार्य व मार्गदर्शन होत असते, गटविकास अधिकारी यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल पाहिला व शाळेचे कौतुक केले तसेच शाळेचे प्रशस्त मैदान सुशोभीकरण करण्या संबंधी सूचना मांडल्या व शाळेसाठी मदत करू असे आश्वासन दिले.
सरपंच अलका नरोळे , शाळेचे विश्वस्त दादासाहेब मानसिंग शिंदे संदीप नरोळे,ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस ,शिवाजी लवटे व दत्तात्रय लवटे तसेच ग्रामसेविका शीला साळवे मॅडम, ग्रामपंचायत तसेच कर्मचारी सर्व शिक्षक उपस्थित होते .

महिलांचे मन आनंदी असणे गरजेचे आहे- डॉ योगिता निटवे


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- जि प शाळा पिरळे येथे 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महिला व बाल आरोग्य तज्ञ डॉक्टर योगिता निटवे यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.यावेळी त्या म्हणाल्या की महिलांचे मन आनंदी गरजेचे आहे.जीवन जगत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. महिलांनी प्रामुख्याने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहजे.
दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे तसेच उपाशी पोटी न राहता मिनरल,प्रोटीन युक्त पोस्टीक आहार घेतला पाहिजे.सकाळच्या नाश्त्यामध्ये काजू, बदाम खजूर,दूध,अंडी पालेभाज्या, फळे प्रामुख्याने खाव्यात. आनंदी राहण्यासाठी महिलांनी स्वतःचे छंद जपावेत अशाप्रकारे त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ महिला सुषमा तोडकर बोलताना म्हणाल्या महिलांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे आपल्या गावातच असलेल्या शाळेमध्ये मुली पाठवली पाहिजेत व ग्रामस्थांनी शाळेच्या भौतिक विकासासाठी साठी प्रयत्न करावेत.आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वाघ सर व ग्रामपंचायत सदस्य सुशीला वाघ यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व जि.प.शाळेस कलर प्रिंटर भेट दिला तसेच शाळेच्या व पुरोगामी महाराष्ट्र तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने संदीप वाघ सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच वृषाली भिसे,शेंडगे मॅडम,मुल्ला मॅडम,नामदे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. महिला दिनानिमित्त शाळेमध्ये पाककला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा मोरेश्रुती साळवे दुतिय क्रमांक कृतज्ञा गोरड गीतांजली खंडागळे तृतीय क्रमांक सावडी खंडागळे सायली माने भाविका माने या विद्यार्थि पारितोषिक मिळाला आहे.या कार्यक्रमास जि.प.चे शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर,पत्रकार प्रमोद शिंदे, भाऊसाहेब भिसे सर,संदीप पवार,विश्वास बनकर,सरपंच अलका नरोळे,उपसरपंच कमल खिलारे,ग्रामसेविका शीला साळवे सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका अनिता सुर्यवंशी, कांबळे मॅडम आता मॅडम तसेच शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढवळे सर, खरात सर, जब्बार मुलानी सर, निगडे सर यांनी परिश्रम घेतले.

नातेपुते पोलिसांनी मोटरसायकल चोर टोळीला ठोकल्या बेड्या

नातेपुते पोलिसांनी मोटरसायकल चोर टोळीला ठोकल्या बेड्या
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –नातेपुते पोलीस ठाणेचे अधिकारी मनोज सोनवलकर व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळीला पोलीस खाक्या दाखवत बेड्या ठोकून त्यांचेकडुन ६,२५,००० / – रुपये किंमतीच्या एकूण ० ९ मोटार सायकली केल्या जप्त नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ७३ / २०२२ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे दिनांक ०२/०३/२०२२ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी डॉ . बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी , अकलुज विभाग , अकलुज व नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मौजे मांडवे गावातील पुणे पंढरपुर रोडवर अहिल्याचौक येथे दोन मुले संशयितरित्या बुलेट मोटारसायकलवर फिरत आहेत . अशी बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री . तानाजी पवार पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकास मिळाली , सदर दोन मुलांना ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असलचे व इतर मोटार सायकली ही त्याचे ०१ साथिदारा ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने चोरलेल्या असल्याचे सांगितल्याने . सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीनामे अदित्य रामभाउ सकट वय २१ वर्षे , काशलिंग उर्फ काशिनाथ दत्तात्रय लोखंडे वय १ ९ वर्षे दोघे रा विजयवाडी ता माळशिरस अटक करून व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयातील १ बुलेट मोटार सायकल व इतर ०२ बुलेट , ०१ पॅशन , ०२ स्पेल्डर , ०१ ड्रिम युगा ०१ प्लॅटीना , ०१ एच एफ डिलक्स अशा अशा एकुण ६,२५,००० / – रु च्या ९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटार सायकली हया नातेपुते शहरातील व अकलूज , माळशिरस , फलटण , इंदापुर , आटपाडी , खडक ( पुणे शहर ) , इत्यादी गावातील आहेत . सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा . तेजस्वी सातपुते मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्री . हिंमतराव जाधव सो , मा . श्री . डॉ . बसवराज शिवपूजे सो .. , उपविभागीय पोलीस अधिकारी , अकलुज विभाग , अकलुज व सहा . पोलीस निरीक्षक , श्री . मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई तानाजी पवार , पोहेकॉ / २११ राहुल रणनवरे , पोना / ८५० नवनाथ माने , पोना / १५८१ मसाजी थोरात , पोना / १७८८ महेश पाटील , पोकॉ / १०४५ मन्सुर नदाफ , पोकॉ / ६०१ राजेंद्र सदगर पोकॉ / १०३८ अजित कडाळे , पोकॉ / २१३ ९ गणेश कापसे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल रणनवरे , पोलीस नाईक नवनाथ माने हे करीत आहेत.

नातेपुते पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा पडतो ताण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- नातेपुते ता.माळशिरस  पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे दिसून येत आहे.नातेपुते पोलीस स्टेशन हे तीन जिल्ह्याच्या सीमेलगत असून येथील बाजारपेठे ही मोठी आहे.मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक घडामोडी होत असते. बुधवारी पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडी बाजार व जनावरांचा बाजार या ठिकाणीच भरतो. जवळच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिखर शिंगणापूर मंदिर असून महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे पंढरपूर,पुणे सांगली, सातारा,इंदापूर,अहमदनगर या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे गुन्हेगारांचा वावर ही छुप्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो. पुणे पंढरपूर हा प्रमुख पालखी महामार्ग असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुद्धा आहे.पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 35 खेडी आहेत. तसेच शिवपुरी दूर परिक्षेत्र,फोंडशिरस बीट,धर्मापुरी बीट अशा प्रकारचा भाग असून, डोंगराळ व दुर्गम भाग सुद्धा नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात मोडत आहे. परिसरातील भाग मोठा असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे असून ते सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्युटी करून त्यांच्यावर ताण येत असून त्या कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.काही कर्मचाऱ्यांना प्रसंगी डे-नाईट ड्युटी करावी लागते. त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.नातेपुते पोलीस स्टेशन साठी  १०५ कर्मचाऱ्यांची मंजुरी असून तीन अधिकारी आहेत एक एपीआय व दोन पीएसआय व सध्या 38 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामध्य ६ कर्मचारी साप्ताहिक सुट्टी वर तर २ रजेवर असतात. 30 कर्मचाऱ्यावर व अधिकारी यांच्यावर कामाचा लोड येत आहे. त्यामध्ये डेली वायरलेस साठी दोन, कर्मचारी सीसीटीएनएस साठी दोन कर्मचारी,ठाणे अंमलदार 2 ,दवाखाना एन्ट्री एक ,लॉकअप पोलीस स्टेशन गार्ड चार ,अंगरक्षक एक ,कोर्ट ड्युटी एक, गोपनीय एक,क्राईम एक, बारनिशी एक ,कारकून एक, सिओ दप्तरी प्रत्येकी एक, त्याचप्रमाणे ट्राफिक, ऑफिस,बंदोबस्त, पेट्रोलिंग, अशाप्रकारे कर्मचारी लागतात.परंतु कर्मचारी संख्या कमी असल्याने बाकी कर्मचाऱ्यावर ताण पडत असून याचा परिणाम कामावर होत आहे.सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलीस कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी जनसामान्यातून होताना दिसून येत आहे.

१० रुपयाच्या ठोकळ्याचे शासनाने जनजागृती करणे गरजेचे -हितेश दोशी

पुरोगामी महाराष्ट्रा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)– १० रुपयाचा  ठोकळ्या बद्दल लवकरात लवकर शासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे असे शासनाला नातेपुते येथील व्यापारी हितेश दोशी यांनी आवाहन केले आहे.नातेपुते ही मोठी नावाजलेली बाजारपेठ आहे व या बाजारपेठेत बत्तीस खेड्यातील लोक येत असतात.सध्या १०रुपयाच्या ठोकळा बद्दल बाजारात पेठेत ग्राहकांचा गैरसमज पसरवले जात आहे.काही ग्राहक १०रुपयाचा ठोकळा चलनात वापरण्यास तयार नाहीत १० रुपयाचा ठोकळा व्यापाराने दिला तर तो ठोकळा घेण्यास साफ नकार देत आहेत. त्यांच्या मते दहा रुपयाचा ठोकळा चलनातून शासनाने बंद केला आहे.अशी अफवा पसरल्याने ग्रामीण भागातल्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचा ठोकळ्या बाबत शासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे. याबाबत नगरपंचायतीने सुद्धा जनजागृती करणे गरजेचे आहे असे नातेपुते येथील प्रसिद्ध व्यापारी सन्माती सेवादलाचे सामाजिक कार्यकर्ते हितेश हुकुमचंद दोशी यांनी मत व्यक्त केले आहे.

आमचा हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे- डॉ.केवल उके

आमचा हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे- डॉ.केवल उके 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)

आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचा निधी इतरत्र वळवून नका डॉक्टर केवल उके  यांनी पंढरपूर येथे सर्व महापुरुष यांच्या संयुक्त जयंती निमित्त झालेल्या चर्चासत्रात प्रतिपादन केले.नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने महापुरुषांच्या आयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जरी साजरा करत असलो तरी शासन आमच्या सोबत अजून सुद्धा भेदभाव करत आहे. आमचा हक्काचा निधी इतरत्र वळवला जातो. तो आमच्या हक्काचा निधी आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आहे. त्यासाठी बजेटचा कायदा झाला पाहिजे.आणि या कायद्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. सोमे से पच्चीस हक है हमारा!असा नारा त्यांनी दिला.या कार्यक्रमात राज्य सचिव वैभव गीत बोलताना म्हणाले आमचा निधी धनंजय मुंडे वळवत आहेत. मुख्यमंत्री उच्च दक्षता अधिकार समिती गठित करत नाही.खरोखर शासन आमच्यासोबत भेदभाव करतय कार्यकर्त्यांनी पीडितांच्या पुनर्वसन करण्यावर भरद्यावा. एन.डी.एम जे एकमेव संघटना आहे येथील पीडितांसाठी मंत्रालय व प्रशासकीय स्तरावर मदत करण्याचे काम करते. या कार्यक्रमात सामाजिक व विविध  क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांना सावित्री रमाई जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांचाही विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच विकास दादा धाईंजे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. तसेच शिवराम कांबळे ,राष्ट्रवादीच्यानेत्या भालके मॅडम ,माजी नगराध्यक्ष उज्ज्वला भालेराव ,दिलीप आदमाने पंचशीला कुंभारकर, प्रमोद  शिंदे ,ऍड सुमित सावंत ,वैभव धाईंजे, अर्चना मस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संजय झेंडे, वैभव काटे, संजय माखे गावकर,पंकज काटे, वेताळा खरबडे, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोविंद सावंत,अविनाश ताकतोडे,विशाल ननवरे, लखन सावंत, अनिल नवगिरे, बळीराम वाघमारे, वासुदेव साठे,बबन नवगिरे,परमेश्वर गेजगे, मंगेश ननवरे, रुपेश वाघमारे, स्वप्नील जाधव, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन रोहित एक मल्ली धनाजी शिवपालक यांनी केले.

राज्य सचिव वैभव जी गीते उपस्थितांना मार्गदर्शन करताना
आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार वितरण करताना
राज्य महासचिव डॉक्टर केवल ऊके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नातेपुते नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अविनाशभाई दोशी

नातेपुते नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अविनाश दोशी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेऐतिहासिक नातेपुते नगरपंचायतीच्या पहिल्या स्वीकृत नगरसेवक पदी सामाजिक कार्यकर्ते अवी भाई उर्फ अविनाश दोशी यांना संधी मिळाली नातेपुते तालुका माळशिरस येथील 88 वर्षाचे ग्रामपंचायतीचे नगर पंचायती मध्ये विलीनीकरण झाले.पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती च्या महिला उमेदवारा साठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने अध्यक्षपदी उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांची निवड करण्यात आली.तर उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे बाबाराजे देशमुख यांची निवड करण्यात आली.तर स्वीकृत सदस्य पदासाठी जनशक्ती विकास आघाडी च्या वतीने अविनाश दोशी यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता.त्यांचा अर्ज वैध झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी अविनाश दोशी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा केली.अविनाश दोशी हे जैन समाजातील पहिले नगरसेवक झाले असून त्यांचे बहुजन समाजासाठी सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात दोन महिने त्यांनी गोरगरीब लोकांना घरोघरी अन्न पोचून अन्नदान केले. तसेच नातेपुते नगरी सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेतला ते निसर्गप्रेमी असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवले आहेत. निवड झाल्यानंतर माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला त्यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,नगराध्यक्षा उत्कर्षा राणी पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,माजी सरपंच अमरशील देशमुख, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगरसेवक दिपाली देशमुख,भारती पांढरे,अनिता लांडगे,संगीता काळे, रणजीत पांढरे, अण्णा पांढरे, सुरेंद्र सोरटे,अतुल बावकर,बाहुबली सेठ शंकेश्वर, संजय कुमार गांधी,संदीप ठोंबरे,नंदू लांडगे, शक्ती पलंगे,डॉक्टर तेजस संकेश्वर, अश्विनी दोशी, विनोद भाई दोशी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खंडकरी शेतकऱ्याने अडवणूक केलेला बेकायदेशीर रस्ता खुला करण्यास शेळके साहेबाच्या प्रयत्नांना यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -आधीच कोरोना महामारीने गारद झालेल्या शेतकऱ्याचा वर्षानुवषे चालू रहदारीचा रस्ता खंडकरी शेतकरी संतोष माणिक पाटील , गुरसाळे याने बेकायदेशीर पने अडवणूक करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला. रस्ता खुला करण्यासाठी शेळके साहेबांसह इतर शेतकऱ्यांनी मागील 1.5 महिन्यापासून न्यायालयीन लढा चालू केला होता. 15 जानेवारी ला आत्मदहणाचा इशारा दिला होता परंतु प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्ता खुला करून देण्यासाठी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. रस्त्या अभावी परिसरातील ऊस तोडणी होत नव्हती , दूध , तरकारी गाड्या येणे जाणे बंद पडले होते . दवाखाण्यासारखी अत्यावश्यक सेवाही बंद पडली होती .अशा प्रकारे रस्ता अडवणूक करून शेतकऱ्यास वेठीस धरणाऱ्या मुजोर खंडकरी शेतकऱ्याचा ( संतोष प्पाटील )परिसरातून जाहीर निषेध करण्यात येत होता. मागील 1 महिन्यापासून शेळके साहेब व इतर शेतकरी यांच्या अथक पाठपुऱ्याव्यामुळे प्रशासनाला सुद्धा ताबडतोब कारवाही करावी लागली . प्रशासनाने सर्व कायदेशीर बाजू तपासून दि 23 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्थासाहित रस्ता खुला करून दिला. रस्त्यात अडथळा निर्माण करून अतिक्रमण करणाऱ्या संतोष माणिक पाटील या शेतकऱ्यास पोलिसांना ताब्यात घ्यावे लागले .”भगवान के घर मे देर है मगर अंधेर नाही ” हे पुन्हा सिद्ध झालं. रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनद टिपण्यासारखा होता . शेळके साहेब हे एक संघर्षातून तयार झालेलं निस्वार्थी , प्रमाणिक , दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे ही त्यांची ख्याती आहे. रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून अवघ्या 1 महिन्याच्या आत प्रशासनाला रस्ता खुला करण्यास भाग पाडले व दिलेला शेतकऱ्याचा शब्द पाळला त्यामुळे सर्व स्थरातून शेळके साहेबाचे अभिनंदन होत आहे.

You may have missed