आंतरराष्ट्रीय

भावाने केला भावाचा खून

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज

दिनांक ११ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे सख्खा भाऊ पक्का वैरी ! या म्हणी प्रमाणेच मोठ्या भावानेच आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन आपल्या सख्या छोट्या भावाचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मयताचे मेव्हणे राजकुमार वसंतराव जाधव (वय ५५, रा. सराफवाडी ता. इंदापूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव विठ्ठल पवार (वय ५५) सुधीर ज्ञानदेव पवार (वय ३१) व शरद ज्ञानदेव पवार (वय ३४) सर्व राहणार अगोती नं. १ यांच्यावर भा.द.वि. कलम ३०२,२०१, व ३४ नुसार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्तांत असे की, वरील तिन्ही आरोपींनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून केबलचे टॅग ने मयत प्रभाकर विठ्ठल पवार (वय ५२, सध्या रा. पिंपरी चिंचवड पुणे ,कायमचा पत्ता अगोती नं.१) असून अगोती येथील संजय अवताडे यांच्या केळीच्या शेतात गळा आवळून आपल्या सख्ख्या भावाचा आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन खून केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिवगावकर यांच्या आदेशाने व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

नातेपुते येथे माऊलींचे पुजन करून समाजआरती करण्यात आली

  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी वारी सोहळा यंदा सलग दुसऱ्यांदा रद्द झाला, सोहळा रद्द झाला असला तरी प्रथेप्रमाणे नातेपुते येथे मुक्कामी दि.१४ जुलै बुधवार रोजी असतां, शेकडो वर्षाची परंपरा म्हणून नातेपुतेकर ग्रामस्थांच्या वतीने तसेच भजनी मंडळ व ह भ प, भगत महाराज   यांच्यावतीने माऊलींच्या पालखी तळावर सायंकाळी माऊलींचे पूजन करून भजन करून समाजआरती घेण्यात आली,                              यावेळी कोरोना नियमाचे पालन करून नातेपुते गावातील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी माजी आमदार, अॅड रामहरी रुपनवर, सरपंच कांचन लांडगे, चंद्रकांत तात्या ठोंबरे, विजय दादा उराडे, नातेपुते गावचे माजी सरपंच अमरशील देशमुख,अॅड बी वाय  राऊत, ॲड.रावसाहेब पांढरे साईराज गॅस एजन्सीचे आप्पासो भांड, भारत सोरटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,विनायकराव उराडे, संजय मामा उराडे, आकाश भांड, देविदास भैय्यासाहेब चांगण, गणेशजी उराडे, नंदकिशोर धालपे, मनोज राऊत सर, राजाभाऊ जठार, ग्रामपंचायत सदस्य डाॅ नरेंद्र कवितके,प्रकाश साळवे, तसेच गणेशजी कुचेकर,नारायण काळे,अशोक पिसे, विवेक राऊत, राजेंद्र लाळगे, बालवारकरी वेशभूषामध्ये राया विवेक राऊत, नातेपुते भजनी मंडळ यांच्यावतीने नाना महाराज पांढरे, तुकाराम ठोंबरे,साहेबराव देशमुख, नारायण चांगण, अशोक पिसे, लक्ष्मण महाराज पिंगळे, बाबा बरडकर, भागवत चांगण,अनिल गरगडे, दिपक पिसे, रमेश लांडगे, सागर जठार, बाबुराव कुचेकर, चंद्रकांत कवितके, चंद्रकांत इंगोले, छगनराव मिसाळ, पिंटु कोरटकर, सचिन साळी, केशव जोरे, अनंता सोनवळ, जनार्दन बरडकर, विठ्ठल पिसे,बाळासो होळ, दयानंद लाळगे,भैय्यासाहेब घुले, माऊली कवितके, गणेश घुले, संग्राम जठार, सागर पोटे, जाधव पेंटर, शैलेश बोराटे, सागर भोसले, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत तसेच महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ भाविकभक्त व पत्रकार उपस्थित होते यावेळी नातेपुते गावचे जेष्ठ किर्तनकार ह भ प मनोहर महाराज भगत यांनी आपली वारी आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे, पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आहे आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे पंढरीची वारी आहे.अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर आपण सर्वांनी एकदा तरी ही पंढरीची वारी अनुभवायला हवी.

स्वबळावर सत्ता मिळविणे कठीण असल्याने युती करून सत्तेत सहभागाचा मार्ग योग्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 12 – महाराष्ट्रात स्वबळावर 145 आमदार निवडून आणून सत्ता मिळविणे आता कठीण आहे. त्यामुळे युती करून सत्तेत सहभाग घेऊन सत्तेचा समाजाचे प्रश्न सोडविणे; समाजाला लाभ मिळवून देणे हाच मार्ग योग्य असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.  भारतीय राज्यघटने चे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही चालवीत आहोत. अनेकांनी रिपब्लिकन नाव पुसुन टाकले आहे.आम्ही मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसू देणार नाही आणि कधीही मिटू देणार नाही असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी वडाळा रमा माता नगर  येथे केले.रिपाइं चे मुंबई प्रदेश सचिव बाबा काळे यांच्या प्रयत्नातून वडाळा येथील रमामाता नगरमध्ये अपंग दिव्यांग वृद्धांसाठी व्हीलचेयर चे मोफत वाटप आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप  केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; दुर्गा साबळे;  गौतम गायकवाड; सचिन गायकवाड; रतन अस्वारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक अति उत्साहात संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक अति उत्साहात संपन्न

  • दिनेश लोंढे –
    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दोंडाईचा (धुळे),दि.१२ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक दोंडाईचा जिल्हा धुळे येथे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब वाल्मीक दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थिती होती या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अण्णासाहेब वाल्मिक दामोदर यांनी किल्ले लळींग लंडोर बंगला भिमस्मृती यात्रा धुळे येथे ह्या वर्षी 31 जुलै रोजी मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहावे आसे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी मा.रमेशजी मकासरे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर बाबुजी धिवरे,उत्तर महाराष्ट्र सचिव रविभाऊ रुपा गांगुर्डे,धुळे जिल्हाप्रमुख शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हाप्रमुख अरविंदजी कुंवर,युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, मिनाताई बैसाणे, नयनाताई दामोदर, नगरसेविका लक्ष्मीताई मकासरे,वंचितचे प्रदेश सचिव नानासाहेब ठाकरे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष शंकर जाधव, जगन्नाथ ठाकरे, काशीनाथ देवरे, आबासाहेब खंदारे, अंजनाताई चव्हाण, राजुबाबा शिरसाठ, संजयभाऊ बैसाणे,आदित्य निकम,दाऊद शेख, आसीफ शेख आदी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक यांनी केले होते.

दहिगाव येथील युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून केला खून

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे ): दहिगाव तालुका माळशिरस येथील नोकरीनिमित्त पुण्यात गेलेल्या नितीन निकम या युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना शनिवारी हडपसर येथे घडली आहे.यासंदर्भात हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,नितीन निकम आणि त्याची पत्नी अंजली नितीन निकम वय 22  हे दोघेही पुणे येथील चक्रपाणी वसाहत,भोसरी येथे सोबत राहत होते.नितीन हा भोसरी येथील खाजगी कंपनीत इलेक्ट्रिशियन चे करतो.त्याच्या लग्नाला 6 वर्ष झाले असून त्याचा पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता.वारंवार या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत असत.काही दिवसांपूर्वी याच कारणावरून भांडण झाले होते.म्हणून ते हडपसर येथील नातेवाईकांकडे गेले शनिवारी देखील त्या दोघांची भांडणे झाली त्यानंतर ते दोघे हडपसर वरून दहिगावकडे गाडीवरून जाण्यासाठी निघाले असता.रस्त्यामध्ये दोघांची भांडणे झाली रागाच्या भरात नितीन निकम ने पत्नी अंजली हिचा भररस्त्यात बंटर बर्नाड शाळेजवळ गळा चिरून खून केला. खून करून तो स्वतः हडपसर पोलीस स्टेशन येथे अटक होण्या साठी हजर झाला. ही घटना शनिवारी दिनांक 10जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

खून केल्यानंतर आरोपी नितीन हा देखील आत्महत्या करण्यासाठी निघाला होता.तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.मात्र भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले.या सर्व प्रकारानंतर आरोपी नितीन निकम स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी नितीन विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

हडपसर पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपात अटक केली आहे व न्यायालयात हजर केलेअसता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या पीएसआय राजश्री पाटील मॅडम करीत आहे.

आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

     पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- महात्मा जोतीराव फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवक हे रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहत असतात.आरोग्य मित्रांचा संपर्क हा प्रथमदर्शी रुग्णांशी,रुग्णांच्या नातेवाईकांशी येतो.म्हणून कोरोना कोविड 19 चा संसर्ग होण्याची शक्यता असते.अनेक आरोग्यसेवक व आरोग्यसेवकांचे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आल्याने आरोग्यसेवकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही आरोग्यमित्रांकरवीच होते.आरोग्यमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात आरोग्यमित्रांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब आधारित असते आणि अशा आरोग्यमित्रांना तुटपुंज्या पगारावर कंत्राटी पद्धतीने विमा कंपनीने कामावर ठेवले आहे.अगदी एखाद्या बैलाला ज्याप्रमाणे शेतात राबवून काम करून घेतले जाते त्याचप्रमाणे आरोग्यमित्रांना राबवून घेतले जात आहे.आरोग्य मित्रांचा मासिक पगार किमान 25 हजार रुपये इतका करावा.
आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

आरोग्य मित्रांची संख्या कमी असल्याने अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यमित्रांची नियुक्ती नसते त्यामुळे संध्याकाळी व रात्री एखादा पात्र रुग्ण योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यास योजनेची माहिती देण्यासाठी,रजिस्ट्रेशन करण्यासाठी आरोग्यमित्र नसल्याने अंगीकृत रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात.अतिरिक्त पैशाची मागणी करतात.बेड शिल्लक नाही असे म्हणतात. अशा कठीण प्रसंगात रात्रीच्या वेळी आरोग्यमित्र नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत होत नाही प्रसंगी रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागतात.ही बाब अतिशय गंभीर असून विमा कंपनी व शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रत्येक आरोग्यमित्र यांचा 50 लाख रुपयांचा विमा काढावा.आरोग्य मित्रांसोबत भेदभाव करू नये सरकार व विमा कंपनी मिळून आरोग्यमित्र यांचा छळ करीत आहेत.आरोग्य मित्र सुद्धा आरोग्यविभागाचा फ्रंटलाईन कर्मचारी आहे.विमा कंपनीच्या नियमांप्रमाणे आरोग्य सेवकांची कर्तव्य व शैक्षणिक पात्रता नमुद आहेत.एवढ्या शैक्षणिक पात्रतेच्या कर्मचाऱ्यास तुटपुंज्या पगारावर स्वतःचे कुटुंबाची उपजीविका तरी भागवता येईल का?राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व सोयी सुविधा आरोग्य सेवकांना लागू कराव्यात.त्यामुळे महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचा मासिक पगार 25 हजार रुपये करून प्रत्येक आरोग्यसेवकाचा 50 लाख रुपये विमा काढून अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यसेवकांची नियुक्ती करावी.यासाठी आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तसेच प्रधान सचिव आरोग्य विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनदायी आरोग्य हमी सोसायटी यांना निवेदने दिली आहेत.कार्यवाही न झाल्यास 15 आगस्ट 2021 रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजना जीवनदायी भवन वरळी यांच्या कार्यालयापुढे जनआंदोलन केले जाईल व होणाऱ्या नुकसानिस विमा कंपनी जबाबदार राहील असे निवेदनात म्हंटले आहे.

जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे यांच्या वाढदिवसा निमित्त मळोली येथे रक्तदान शिबीर संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-चळवळीचे जेष्ठ नेते,जिल्हा परिषद सदस्य मा.त्रिभुन उर्फ बाळासाहेब धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाई शाखा मळोली व वीर फकिरा ग्रुप मळोली  यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात ७१ रक्त दात्यांनी रक्त दान केले.तसेच वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वेळापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला  सदर कार्यक्रमास रिपाई चे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार साहेब,दयानं धाईंजे आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,दत्ता कांबळे- डॉक्टर कुमार लोंढे, नाजी,मिलिंद सरतापे,प्रदीप धाइंजे,रेखाताई कांबळे व माया जाधव रजनीश बनसोडे,रविराज बनसोडे,पत्रकार प्रमोद शिंदे व प्रशांत खरात, शशांक पाटील,हनुमंत वायदंडे,गुरू करचे, सोमा भोसले,अँड.निशांत लोंढे,भाऊ थोरात,वैभव बाबा जाधव,पांडू मासाळ,शंकर सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

कांदा निर्यातीवरील बंदी  तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)कांद्याच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून पावसाळी कांदा शेतकऱ्यांचा  बाजारात आलेला नाही तोवरच कांदा निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सध्या कांद्याला मिळणारा चांगला दर थांबला आहे. केंद्र शासनाने भारतात कांद्याचे दर वाढत असल्याने तसेच भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.परंतु या कांदा निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यावर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर त्या निर्णयास विरोध करून केंद्रीय व्यापार वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांना तात्काळ संपर्क साधत व पत्रव्यवहार करून कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी  दिनांक 15 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे. या पत्रातील मागणीमुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

https://www.shakkyalegal.com/

https://www.shakkyalegal.com/

कोरोना संदर्भात नागरिकांनी गाफील न राहता सतर्क रहावे- सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- covid-19 कोरोना संदर्भात नातेपुते व परिसरातील लोकांनी गाफील न राहता सतर्क राहावे असे आव्हान रत्नत्रय इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज संचालक, महावीर इलेक्ट्रिक चे मालक, सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा यांनी केले आहे.कारण नातेपुते आणि परिसरात कोरणा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे नातेपुते ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नातेपुते आणि परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते एकमेकांचा संपर्कही मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच नातेपुते आणि परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मृत्यूची संख्या ही वाढत आहे.त्यामुळे नातेपुते बाजारपेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सँनीटायझर वापर हा नियमित करावा नाही तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असेल. प्रत्येक घरांमध्ये कोविंड रुग्ण सापडू शकतो. सध्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड शिल्लक नाही ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच काळजी स्वतः घ्यायला हवी तसेच नातेपुते येथे शासकीय ऑक्सीजन बेड सह कोविड सेंटर लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा नातेपुते

पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांना लाडका भाचा सुरज वनसाळे यांचे सोशल मीडियाद्वारे पत्र

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
प्रिय दत्तामामा भरणे
सविनय जयभीम
पुन्हा काही दिवसांसाठी वाढत्या कोरोनाचे कारण देत आपल्या प्रशासनाने तालुका लाॅकडाऊन केला.
मामा,
या लाडक्या भाच्याची विनंती आहे की,
१) काही महिलांना(तालुक्यातील आपल्या काही बहीनींना) शेतात कामाला जावे लागते. कारण नवरा कामाला जाताना पोलीस कार्यवाही ला सामोरे जावे लागते.प्रसंगी मारही खावा लागतो किंवा आर्थिक झळही सोसावी लागते. लहान लहान मुले, लग्नाला आलेली मुलगी,अचानक उद्भवणारा दवाखाना ,शेती महामंडळाच्या पडक्या घरांची डागडुजी यासाठी फक्त २०० रुपये मध्ये रोजंदारीवर कामाला जावे लागते आहे. तुमच्या लाॅकडाऊन चे त्यांना घेणे देणे नाही. कधीतरी मरायचेच आहे असे महिलांचे म्हणणे आहे. कृपया त्यांची दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३३ वाजता शेळगाव येथे गाडी अडवून पोलीसांनी पावती केली आहे मोठा भाऊ म्हणून आपण त्यांना पैसे परत करा.(उद्या पुन्हा पावती होणार आहे! वालचंदनगरला तसा दम मिळाला आहे.)
२) कोरोना वाढण्यास गोरगरीब, सामान्य कार्यकर्ते, गवंडी, मजुर, यांचा काहीच संबंध नाही. सुशिक्षित बेरोजगार यांचाही संबंध नाही त्यांची लग्न मोडत आहेत. कुठे काम नाही, त्यामुळे व्यसनाधीनता वाढत आहे….वय वाढत आहे.त्यांचा आत्महत्या करण्याचा विचार आहे. त्यांना कोरोनाने मेल्यामुळे काही फरक पडणार नाही असे बेरोजगार मुलांचे म्हणने आहे. कृपया काम बघा, जमत नसेल तर मुलगी बघा. त्यांचे काही महिन्यांपासून आलेले नैराश्य जाईल.
काही गोष्टी अपवाद असतात. योग्य कामात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही.काही बाबींमध्ये आम्ही दुर्लक्ष करतोच ना?…… तसेच आपल्या कार्यकर्ते यांनी गावागावात अडीचशे रुपयाचे दिलेले कीट दोन महिन्यापूर्वीच दोन दिवसात संपले. शासनाने दिलेले पाचशे रुपये कुठे गेले ते आता सांगणार नाही. पावसाने चांगलेच झोडपले आहे किरकोळ आजारांनी व त्याला आलेल्या खर्चांनी सामान्य माणूस खचून गेला आहे. त्यामुळेच राबराब राबणाऱ्या महिलांना १ रुपया महत्त्वाचा आहे.मामा आपले,शासनाचे, पोलीस यंत्रणेचे काम खुप चांगले चालले आहे. निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश येवून कोरोना आटोक्यात येईल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तसेच मामा, काही खाजगी डाॅक्टरांनी औषधे चोरली ते खरे आहे का ? त्यांच्यावर गुन्हे दाखल केलीत का ?
असो, निश्चित या भाच्याला आपण नाखुश करणार नाही.तसेच कोरोनापासुन तब्ब्येतीची काळजी घ्या. पोलिस बांधवांना या आजारापासून तब्बेत जपण्यास सांगा. अन् तेवढे पैसे द्या. त्या सर्व १८ महिलांना आपल्या घरी फाडलेल्या पावतीचे पैसे नेण्यास पाठवु का ?
कळावे

आपला लाडका भाचा
सुरज वनसाळे
लाडका भाचा सुरज वनसाळे अध्यक्ष मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना