Blog

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा विद्युत वितरण कंपनीला शॉक बारा तासात काम पूर्ण

बातमी पूर्वीचा डीपी
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी काम करताना

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे गेल्या सहा दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे लाईट नसल्याने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने याचा पाठपुरावा करत यासंदर्भात काल विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे पिरळे गावठाण अंधारात अशी बातमी प्रसिद्ध केली व लाईट च्या संदर्भात संपादक प्रमोद शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलणी करून तात्काळ वीज वितरण कंपनीला पिरळे गावठाणातील डीपी बसवण्यास सांगितले अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला असता तात्काळ वीज वितरण कंपनीने याची दखल घेत बारा तासाच्या आत नवीन डीपी व गावातील सर्व लाईटचे मेंटेनन्स एका दिवसात करून घेतले. यामुळे पिरळे गावठाणातील लाईट सुरळीतपणे सुरू झाली आहे व  वरिष्ठांशी बोलले करून 100  केव्ही व 63 केव्ही अशा दोन एक्स्ट्रा डीपी ची मागणी केली आहे व अकलूज येथील उपविभागीय अभियंता यांनी लवकरच डीपी देण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे पिरळे येथील ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमी मुळे महावितरण विद्युत कंपनीला शॉक लागला असल्याचं सोशल मीडियातून बोलले जात आहे. बारा तासात बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा विद्युत वितरण कंपनीला शॉक बारा तासात काम पूर्ण

विद्युत वितरण कंपनी च्या दुर्लक्षामुळे पाच दिवसापासून पिरळे गावठाण अंधारात

तात्काळ डीपी न बसवल्यास वीज वितरण कंपनी नातेपुते कार्यालयास पिरळे ग्रामस्थांच्यावतीने टाळ ठोक आंदोलन करण्यात
विद्युत वितरण कंपनी च्या दुर्लक्षामुळे पाच दिवसापासून पिरळे गावठाण अंधारात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी नातेपुते विभागाच्यावतीने दुर्लक्ष केल्यामुळे पिरळे गावठाण गेल्या पाच दिवसापासून अंधारात असून गावकर्यां मधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सध्या कोरोना चा वाढता प्रादुर्भाव असल्याकारणाने व लॉक डाऊन असल्याने गावातील सर्व लोक घरीच आहेत व उन्हाळा सुरू असल्याने उन्हाच्या तडाख्याने व गरमीने लोक हैराण झाले आहेत.त्यात गावांमध्ये पेशंट सुद्धा वाढत आहेत लोकांची गैरसोय होत आहे. वॉटर सप्लाय च्या विहिरीला पाणी नाही त्यामुळे गावातील बोरवेल च्या पाण्याचा वापर गावातील लोकांना करावा लागत आहे.घरातील सर्वच उपकरणे मोबाईल व इतर साधने लाईट वर अवलंबून असल्यामुळे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.काही दिवसापासून पिरळे गावठाणा मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे.यासंदर्भात वेळोवेळी गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे लाईट च्या संदर्भात तक्रारी केल्या आहेत.तक्रार केल्यानंतर लाईट ही तात्पुरत्या स्वरूपात सुरु केली जाते. परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. गेल्या पाच दिवसांपासून पिरळे गावठाण येथील लाईट गेली असून अद्यापही लाईट आले नाही.त्याचे कारण असे की गावठाण येथील डीपी जळाला असून तो डीपी बसवण्यात विद्युत वितरण कंपनीस अपयश आले आहे.गावठाण डीपी वरती लोड असल्याकारणाने वारंवार डीपी जळत असून अनेक दिवसापासून ग्रामस्थांनी 63 केव्ही डीपी ऐवजी 100 केव्ही चा डीपी बसवावा व आणखीन एक नवीन 63 केवी स्वतंत्र डीपी बसवण्याची मागणी ीज वितरण कंपनीच्याअधिकार्‍यांकडे केली आहे.परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावाला वारंवार पाच-सहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. या कारणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.की तात्काळ 100  केव्ही व 63 केव्ही चे दोन स्वतंत्र डीपी बसवण्यात यावे अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयात  टाळे ठोकून  कार्यालयासमोर  ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दहिगाव येथे महावीर जयंतीनिमित्त कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

दहिगाव येथे महावीर जयंतीनिमित्त कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त ग्रामपंचायत दहिगाव व श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर व सकल जैन समाज यांच्या वतीने मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे कोविंड केअर सेंटर वी.एम मेहता आय.टी.आय कॉलेज च्या श्रीमती कमल दोशी वसतिगृहाच्या दोन मजली इमारतीमध्ये सुरु करण्यात आले आहे. कोरणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री महावीर स्वामी दिगंबर जैन  मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव संस्थेचे संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने पंचवीस बेडचे कोविंड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.जैन मंदिर समितीच्या वतीने दोन मजली इमारतीसह आवश्यक कॉट,गादी,औषधे व विविध साहित्य देण्यात आले.कोविंड केअर सेंटरचे उद्घाटन नातेपुते येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ.माधव लवटे, जि.प सदस्य ऋतुजा मोरे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तलाठी समाधान पाटील, पोलीस पाटील विठ्ठल मोरे, डॉ.मनोज ढोबळे. डॉ.मेहता डॉ.अभिजीत पाटील, पत्रकार प्रमोद शिंदे, विजयसिंह पाटील,ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे,अजित शिरतोडे, नितीन मोरे, पोपट चिकणे, शितलकुमार गांधी.तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

लाॕकडाऊनमुळे गावी पायी जाणाऱ्या मजुरांचे हाल

लाॕकडाऊनमुळे गावी पायी जाणाऱ्या मजुरांचे हाल
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राजू भोर-
बोरी,दि.२७:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाॕकडाऊन सुरू आहे. त्यातच हाताला काम आणी पोटाला रोटी मिळत नसल्याने रस्त्याने अनेक मजुर लोक आपापल्या घरी पायी परतत असतानाचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसुन येत आहे.
          सध्या राज्यामध्ये सर्वत्र कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.ग्रामीण भागातील शेतीची कामे तसेच बांधकाम आदी कामे ठप्प झाली आहेत.त्यामुळे त्या कामांवरती अवलंबून असणारे मजुर हाताला काम नसल्यामुळे आपापल्या घरी पायी परतत असताना चित्र तालुक्यात दिसत आहेत. रस्त्यावरुन वाहने चालु असुन सुद्धा या मजुरांना एकही वाहन चालक कोरोनाच्या भितीने वाहनांमध्ये घेत नाहीत.तसेच एस.टी.बसही बंद असल्यामुळे या पायी जाणा-या मजुरांचे हाल होत आहेत.घरी जाण्यासाठी त्यांना दहा/बारा, तर काहींना दिवस लागत आहेत.कसेबसे आताच हाताला काम मिळालेले मजुर निराश होऊन घरी परतत आहेत.
सततच्या लाॅकडाऊनमुळे हे मजुर त्रस्त झाले असुन त्यामुळे ‘आपला गावच बरा’ अशी म्हणण्याची वेळ या मजुरांवर आली आहे.

फोंडशिरस येथे नऊ लाखाची घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांकडून अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)फोंडशिरस तालुका माळशिरस येथे नऊ लाखांची घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी केली अटक.याबाबत हकीकत अशी की 19 मार्च 20 21 रोजी फोंडशिरस येथील किशोर हनुमंत गोरे यांच्या घरात रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घर फोडून 9 लाख 48 हजार 600 रुपये चोरून नेले होते यासंदर्भात नातेपुते पोलीसत गुन्हा नोंद करण्यात आला होता.आरोपींनी कोणताही प्रकारचा पुरावा ठेवला नव्हता. परंतु सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज सोनवलकर यांनी चक्र फिरून नातेपुते पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजे खोरोची येथील सचिन पोपट जाधव हा वारंवार  फोंडशिरस भागात येऊन काही काम धंदा नसताना पैशांची उधळपट्टी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली  व याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच सचिन जाधव येणे तुषार दादासो चव्हाण रा.फोंडशिरस, सूरज बिबीशन फासगे रा. वडापुरी तालुका इंदापूर. जि. पुणे मदन अरुण काळे रा. शेटफळ कुमार दत्तू कांबळे,रा. वरकुटे, दादा बबन बोडरे रा. मारकडवाडी , संदीप हरिश्‍चंद्र बोडरे रा.उंबरे दहिगाव,यांच्या साथीने फोंडशिरस येथील घरफोडीचा गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.फोंडशिरस येथील तुषार दादासो चव्हाण याला ताब्यात घेऊन तपास केला असता तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून च्या सांगण्यावरून घरफोडी केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.या सर्वांना न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.आरोपींकडून चोरीस गेलेली रकमे मधून दोन लाख रुपये व एक बजाज कंपनीची 220 पल्सर,दोन स्प्लेंडर मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुरज फासगे रा.वडापुरी ता इंदापूर अरुण काळे रा. शेठफळ कुमार कांबळे  राहणार वरकुटे  ता इंदापूर  हे सराईत गुन्हेगार असल्याचे  तपासात निष्पन्न झाले आहे .यांच्यावरती वालचंद नगर इंदापूर टेंभुर्णी वडगाव निंबाळकर  या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास ए.पी.आय मनोज सोनवलकर हे करत असून सदरची कामगिरी पोहेकॉ४५० अनिल गडदे,१५८१ मसाजी थोरात,८५०नवनाथ माने,१५३३तुषार गाडे,१०३८अभिजीत कडाळे,३४५अमित जाधव,१७३२विश्वास जाणकर,१२विशाल घाडगे,१०५७शाहू काळदाते,सायबर शाखेचे २२१६अन्वर आत्तार यांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला यासंदर्भात नातेपुते पोलिसांकडून माहिती देण्यात आली.सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.

आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड

आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

आंबेडकरी चळवळीचे तरुण तडफदार नेतृत्व रविंद्र बनसोडे कोरोनाशी लढताना पुणे येथे उपचारादरम्यान काल रात्री अखेरचा श्वास घेतला. रविंद्र बनसोडे हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व होते त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पीडितांना न्यायालयीन लढाईमध्ये मदत केली आहे. त्यामध्ये जांब येथील चंद्रकांत गायकवाड हत्याकांड प्रकरण, पुणे येथील माणिक उदागेहत्या प्रकरण, बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या, प्रकरण खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण अशा अनेक पीडितांना त्यांनी न्यायालय लढाईमध्ये मदत केली आहे.तसेच अनेक कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते स्वतः महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांसाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट व माहिती अधिकार यासारख्या कायदेशीर प्रशिक्षण शिबिर घेत असत ते स्वतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून एम एस डब्ल्यू व पॉलिटिक्स या विषयावरती पी.एच.डी केली होती.2002 पासून ते नागार्जुन प्रशिक्षण केंद्र नाग लोक नागपूर येथून दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होते. तसेच त्यांनी पुणे येरवडा येथील माणुसकी संस्था येथे अनेक पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. व ते नॅशनल दलित फॉर जस्टिस या संघटने मध्ये डॉक्टर केवल उके व वैभव गीते यांच्यासोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करत होते. तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा पुणे प्रतिनिधी पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केला आहे.त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये शोककळा पसरले आहे व सर्वत्रर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे .अशा या गुणी चळवळीच्या कार्यकर्त्याला व त्याच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.

शाहरुख मुलाणी यांची रासप अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहर अध्यक्ष पदी निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहराध्यक्षपदी शाहरुख मुलाणी यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी नितीन धायगुडेसाहेब मराठवाडा प्रभारी, अल्पसंख्याक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शाहिद मुलाणी, सोलापूर जिल्हा युवक आघाडी प्रभारी माऊली सरक, अल्पसंख्याक आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रियाजा आतार अल्पसंख्याक आघाडी माण तालुकाध्यक्ष अलताफ मुलाणी रा स प नेते मनोज लांडगे, बाबा बोडरे, तानाजी बोडरे, आनंद दहिवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते

आंबेडकर जयंतीनिमित्त साई सेवा दल च्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनला ऑफिस टेबल भेट

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या साई सेवा दल या संस्थेच्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनला ऑफिस टेबल भेट देण्यात आला नेहमी साई सेवा दलाच्या वतीने अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात साई सेवा दल संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकांना व संस्थांना मदत केली जाते टेबल भेटे देते वेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे API मनोज सोलनकरसाहेब,साई सेवा दल संस्थेचे अध्यक्ष गुरु कर्चे,राष्ट्रीय समाज पक्षाचेपक्षाचे अल्पसंख्याक पच्शिम महाराष्ट्र प्रभारी  शाहिद मुलाणी, उद्योजक बाबासाहेब बोडरे, माजी ग्रामपंचायत सदस्य समिर सोरटे, सोलापूर जिल्हा युवक प्रभारी माऊली सरक, अल्पसंख्याक आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रीयाज आतार, सोमनाथ भोसले, विशाल भुसारे कृष्णा थोरात,आदि मान्यवर उपस्थित होते.

कल्याण येथे भीम जयंती उत्साहात साजरी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक १४/०४/ २०२१ रोजी पहाटे ००:०० वाजता कल्याण येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण (पश्चिम)येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्ण कृती पुतळ्यास पुष्पहारअर्पणकरूनअभिवादन.
एन.डी.एम.जे.राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डॉ.केवलजी उके सर यांच्या हस्ते करण्यात आले व मान वंदना कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण डोबिवली शहर जिल्हा अध्यक्ष अॅड प्रवीणजी बोदडे यांनी सकाळी मोहने व कल्याण पुर्व येथे लाडु वाटुन जयंती चा आनंद व्यक्त केला तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे भारतीय संविधाना च्या १०० प्रत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत वाटुन जयंतीचा
आनंद वेक्त केला व जयंतींच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला. जयंती साजरी करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली अध्यक्ष ॲड .प्रविण बोदडे याच्या हस्ते पुष्प अर्पण करून वअगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली तसेच एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे यांच्या वतीने सुध्दा त्यांच्या ऑल.इंडिया एस.सी.एस.टी रेल्वे असोसिएशन कल्याण OHE शाखेच्या कार्यालयात सुध्दा रेल्वे कर्मचाऱ्यां सोबत सुध्दा छोट्या खाणी जयंती साजरी करण्यात आली नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टिसचे ठाणे जिल्हा संचिव विनोद एस रोकडे यांनी जयंती निमित्त कल्याण पुर्व मधील कर्तव्य निष्ठ डॉक्टर ना कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानचिन्ह दिले व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती च्या शुभेच्छा दिल्या नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस चे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव व कल्याण डोंबिवली शहर सचिव संदीप मधुकर घुसळे सर,
वंचित बहुजन आघाडी वार्ड क्र ९४ चे जेष्ठ कार्यकर्ते विक्रम जाधव व अविनाश बावस्कर बाळु कुडवे राजेन्द्र सोनावने ,अविनाश जाधव, बौद्धचार्य आनंदजी निरभवणे याच्या उपस्थित बुध्द वंदना घेण्यात आली व नागरिकांना जयंती निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या

 

नातेपुते येथे महामानवास अभिवादन

नातेपुते येथे महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते वेळेस बुद्ध वंदना घेताना बोध आचार्य समीर सोरटे व प्रकाश सोरटे व कार्यकर्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नातेपुते तालुका माळशिरस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. नातेपुते येथे सालाबादप्रमाणे 1 एप्रिल पासून भीम जयंती जल्लोषात सुरुवात होत असते मोठ मोठे बॅनर संपूर्ण नातेपुते शहरात रोषणाई व निळ्या झेंड्याची झगमगाट तसेच फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात अतिषबाजी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात नातेपुते येथील जयंती चा प्रथम क्रमांक येतो परंतु यावर्षी एक एप्रिल रोजी फक्त सुंदर अशी लाईट डेकोरेशन ची रोषणाई करून 14 तारखेला बारा वाजता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच सकाळी दहा वाजता धम्म ध्वजारोहण व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच प्रतिमा पूजन करून  ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, एडवोकेट पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य साक्षी ताई सोरटे,सरपंच कांचन लांडगे,उपसरपंच अतुल पाटील,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश  साळवे ,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,सामाजिक कार्यकर्ते समीर सोरटे,रोहित सोरटे,विनोद रणदिवे,संघर्ष सोरटे,तसेच भिमजयंती उत्सव समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राध्यापक साळवे सर मनोगत व्यक्त करताना
अभिवादनस उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व इतर मान्यवर
अभिवादन कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक करताना रोहित सोरटे
नातेपुते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली
विराज डेकोरेटर भैय्यासाहेब सोरटे च्या वतीने डेकोरेशन करण्यात आले

You may have missed