Blog

भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीरफडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात

निवडणुकांसाठी भाजपने २२ डेम दवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, ९९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असूनअकोल्यातून विजय अग्रवाल यांना मिळाली उमेदवारी आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यातआली आहे.भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील ९ मतदार संघाचा सम् ावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे- मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही. दरम्यान गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा म हायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले. महाराष्ट्र विधानसभ निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघार्ड या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. महाविकास आघाडीतह अनेक जागांवरुन खल सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. पुढील फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप १५३, शिवसेना ८० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५५ जागांवर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जाग वाटपात पुन्हा एकदा भाजपकडून ९ आकड्याचे गणित जुळण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप मुंबईत १८ जागा लढवणार आहे- भाजपकडून १४ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, तम अद्यापही ४ जागांवर उमेदवार निश्विती बाकी आहे

लग्नाच्या आमिषाने पावणे अकरा लाखाची फसवणूक : लग्नाच्या आमिषाने विविध…

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

विविध कारणास्तव सुमारे १० लाख ७४ हजार रुपये घेऊन महिलेची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडला.
याबाबत धनश्री अभिजित हातोळकर (वय ४२,रा. क्रिडा संकुल शेजारी अकलूज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक विद्याधर अराणके (वय ५०, रा. सातारा) विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी यांची सप्टेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. तेंव्हापासून ते एकेमेकांना ओळखतात. यातून त्यांच्यात विश्वास निम णि झाला. यातूनच आरोपीने फिर्यादीला
त्यांच्याबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर वेळोवेळी आरोपीने फिर्यादीकडे शेतजमीन विकत घेण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी बँकेतून, गुगल पे व्दारा तसेच रोख स्वरूपात पेसे घेतले.
लग्न करणार असल्याने फिर्यादीने विश्वासाने आरोपीला मागेल त्यावेळी पैसे दिले. परंतु जून महिन्यात आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. यानंतरही आरोपीकडे लग्नाबाबत फिर्यादीने विचारणा केली. मात्र आरोपीने लग्नास नकार देऊन फिर्यादीकडून पावणेअकरा लाख घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्हयाचा तपास सपोनि चौधरी करत आहेत.

मुद्रा कर्जमर्यादा दुप्पट; २० लाख रुपये मिळणार !

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
: केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत (पीएमएमवाय) मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्याचा निर्णय शुक्रवारी केंद्र सरकारने घेतला. सध्याची कर्जमर्यादा १० लाख रुपये होती. ती २० लाख रुपये करण्यात आली. सरकारने तशी अधिसूचनाही जारी केली आहे.नवउद्योग उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मुद्रा कर्जासाठी तरुण प्लसची नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्याश्रेणीअंतर्गत १० लाखांपेक्षा जास्त आणि २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता दिले जाणार आहे. ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणीअंतर्गत पूर्वीची कर्जे घेतली. जे मुद्रा कर्जदारआहेत आणि यशस्वीपणे परतफेड केली आहे, त्यांच्यासाठीही हे कर्ज उपलब्ध असेल. २० लाखांपर्यंतच्या मुद्रा कर्जाची हमी क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिटस्अंतर्गत प्रदान केले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजना ही नॉन-कॉर्पोरेट, बिगर शेती लघू/सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्यासाठी पंतप्रधानांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केलेली योजना आहे. याअंतर्गत दिले जाणारे कर्ज मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहे. या योजनेअंतर्गत बँका, नॉनबँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म-वित्त संस्था आणि इतर आर्थिक मध्यस्थांद्वारे कर्ज प्रदान केले जाते.

नगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेची हत्या. महाराष्ट्राला काळी माफ असणारी घटना,आरोपीला अटक, राज्यात संतापाची लाट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


नगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उकललेले आहे. त्यांचा अंगणवाडीतच खून करण्यात आला असून मृतदेह नदीत फेकून दिल्याचे आढळून आले आहे. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीला मिळणारा पोषण आहार आणण्यासाठी गेलेल्या पालकाची अंगवाडीसेविकेला एकटी पाहून नियत फि रली. त्याने त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार करताच त्यांचा भिंतीवर डोके आपटून खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष बंडू बर्डे (वय २५, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी हल्ली रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात बंद पाळण्यात आला. महेश विठ्ठल पवार (वय ४०, रा.चिचोंडी पाटील) यांच्या पत्नी चिंचोंडी पाटील गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात.
२४ ऑक्टोबरला त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. गावात अंगणावाडीत जाऊन पाहिले असता तेथे कुलूप होते. ग्रामस्थांच्या मदतीने कुलूप तोडण्यात आले. आतमध्ये रक्ताचे डाग, कपडे, केस पडलेले होते. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक कार्यरत करण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नामे सुभाष बंडू बर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याची मुलगी या अंगणवाडीत शिकते. त्याला अंगणवाडी सेविकाचा फोन आला होता. मुलीचा पोषण आहार अंगणवाडीतून घेऊन जा, असा निरोप आला. त्यानुसार तो पोषण आहार आणण्यासाठी तेथे गेला होता. अंगणवाडी सेविकेला एकटे पाहून त्याने त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी विरोध केला. त्यामुळे झटापट झाली. आरोपीने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडी शेजारील नदीत फेकून दिला.

आता सोने झाले स्वस्त,दिवाळापूर्वी सोनं चांदी स्वस्त,ग्राहकांची दिवाळी सोन्यावाणी.


 : दिवाळीपूर्वी सोने चांदी खरेदी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात १४५० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव १ लाख रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा संधी आहे.
परदेशात झालेल्या कमी म करणाऱ्यांसाठी ागणीमुळं सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची किंमत विक्रमी पातळीपासून १४५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. ३००० रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. सध्या दिल्लीत सोन्या चांदीचा नेमका किती दर आहे याबाबतची माहिती पाहुयात. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मंद मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १,१५० रुपयांनी घसरून ८०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. 

माळशिरस विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण ? सर्वत्र चर्चेला उधाण

नातेपुते प्रतिनिधी प्रमोद शिंदे-


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून अगदी संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आले असून.तरीसुद्धा माळशिरस विधानसभा 254 या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण? हा सस्पेन्स अद्यापही कायम राहिला आहे.भाजपवर प्रेम करणारे कार्यकर्ते ही संभ्रम अवस्थेत असताना दिसत आहेत.सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. तिकडे शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार उत्तराराव जानकर यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच मोहिते-पाटील यांच्यासोबत प्रचाराला सुरुवात केली आहे.पहिल्या यादी उत्तमराव जानकर यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या यादीत नाव नसताना सुद्धा. उत्तमरावजी जानकर हे उत्साहाने प्रचार करताना दिसून आले दुसऱ्या यादी उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु भाजपचा उमेदवार कोण? हा प्रश्न अद्यापही सस्पेन्सच राहिलेला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली दिसते. 2019 च्या विधानसभेला भाजप मधून आमदार राम सातपुते यांनी निवडणूक लढवली होती व ते या मतदारसंघातून केवळ 2702 मताधिक्याने निवडून आले होते. 2019 ला मोहिते-पाटील कुटुंबिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करून माळशिरस विधान सभेमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.तिकडे उत्तमराव जानकर हे मोहिते-पाटील विरोधक म्हणून राष्ट्रवादीतून उभे होते. परंतु केवळ 27O2 मताने उत्तम जानकर यांचा 2019 ला निसटत पराभव झाला होता.परंतु 2024 मध्ये लोकसभेला भाजपने मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांना डावल्यामुळे पुन्हा मोहिते-पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.पाठोपाठ उत्तमराव जानकर ही शरदचंद्र पवार त्यांच्या पक्षात राहिले.लोकसभेला उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्याशी मनोमिलन करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांना लीड दिले. माळशिरस तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे आता शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये आल्याने. त्यांची ताकद दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपची ताकद कमी झाल्याचं तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवा सरांकडून अशा तालुक्यात पक्षाला उभारी देण्याचं काम स्थानिक कार्यकर्ते व नेते मंडळींनी केले होते.परंतु अध्याप ही उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे. भाजपचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते शांत असल्याचं दिसून येत आहे. पुन्हा आमदार राम सातपुते यांनीच माळशिरस विधानसभा निवडणूक लढवावी असे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे समजते. परंतु सध्या माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद वाढल्याने भाजप पुढे मोठा पेच पडला परंतु भाजपचे आमदार राम सातपुते यांनी पाच वर्षात अनेक विधायक कामे केल्याने व अनेक लोकांना वैद्यकीय मदत केल्याने आमदार राम सातपुते यांची आरोग्य दूत म्हणून तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे व त्यांचा स्वतंत्र गट निर्माण झाला आहे. याच कामाच्या व गटाच्या जोरावर ते निवडणूक लढू शकतात परंतु.भाजप कोणता डाव खेळणार हा येणारा काळ सांगू शकेल.

आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चिती साठीचा पुरावा नाही..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चितीसाठीचा पुरावा नाही
आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असं म्हटलं आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा.
मोटार अपघात संबंधीचा दावा न्यालयात  होता. ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करुन ९ लाख २२ हजार ३३६ रुपये केली. अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी असलेलं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर असलेल्या जन्म तारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता. त्यानुसार मृत व्यक्तीचं वय ४७ धरलं होतं आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी आधार कार्डवरची जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं वय चुकीचं असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच आधार कार्डवरची जन्मतारीख वय ठरवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असंही म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं मृत्यूसमयी वय ४५ होतं.

माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत 26व 27ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

पुरोगामी महााष्ट्र न्युज नेटवर्क

माळशिरस (अ.जा.) २५४विधानसभा मतदारसंघ
ची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 30रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 20नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार असून 23नोव्हेंबर रोजी अकलूज येथे वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे.
25ऑक्टोबर अखेर 42उमेदवारांनी एकूण 63अर्ज खरेदी केले असून एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६/१०/२०२४ व दि. २७/१०/२०२४ रोजी चार टप्प्यात होणार असून दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वापेजर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० कर्मचारी / अधिकारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन अकलूज येथे होणार असून, त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे होणार आहे. दोन्ही दिवशी १८०४ कर्मचारी / अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरीन- शहाजी बापू पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


शहाजीबापू पाटील संजय राऊतांवर  कडाडले शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांचीयादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्येमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनापुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातूनशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकडसापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले होते.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांनालक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरुझाल्या होत्या. मात्र आता शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतरशहाजी बापू पाटील यांनी गुलाल नाय उधळला तर फाशीघेऊन मरेन, असं आव्हान दिलं आहे.”मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे,” असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरकेली. शिवसेनेकडून ४० विद्यामान आमदारांना पुन्हाउमदवारी देण्यात आली. सांगोल्यातून पुन्हा एकदाशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारीमिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलोनाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे. तसेचखासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनीइशारा दिला आहे.तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. “माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

महानुभाव पंथीय सर्व साधुसंत मठ परिवाराच्या वतीने महानुभाव पंथीयांच्या मठांच्या घरपट्टीमध्ये नगरपरिषद करामध्ये कर सवलत मिळवून दिल्याबद्दल फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण

 अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री श्यामसुंदर शास्त्री विध्वंस म्हणाले अनुप शाह यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून पंथाची केलेली सेवा व सर्वांच्या लक्षात राहणारी असून त्यांचे कार्य असेच पुढे चालू राहावी असा शुभ शनिवार देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे असून गेले पंचवीस तीस वर्ष मागणी करून सुद्धा महानु भाव पंथीय मठांना कर सवलत मिळत नव्हती ती कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचा अभ्यास करून नियमानुसार सर्वच धार्मिक मठांना अनुप शहा यांनी कर सवलत मिळवून दिले असून त्यांचे कार्य असेच वाढत राहो असा शुभ आशीर्वाद देतो या सत्कार समारंभ प्रसंगी महंत श्री गोविंदराज लांडगे महंत भरत दादा विध्वंस चक्रधर दादा विध्वंस अभी दादा सिन्नरकर श्री परसराज जामोदेकर महंत श्री मुकुंदराज बिडकर अमोल दादा लांडगे श्री नरेंद्र लांडगे अक्षय दादा विध्वंस कृष्णराज दादा लासुरकर शहाजी दादा जामोदेकर युवाआचार्य श्री प्रकाश मामा श्री श्याम दादा जामोदेकर श्री गौरव राज शेवलीकर श्री अमित कपाटे श्री आसेगावकर बाबा हरिराज शास्त्री विधवां यांच्यासह मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाचे साधुसंत अनुयायी उपस्थित होते.

You may have missed