श्रीनिवास कदम-पाटील यांना कुस्ती-मल्लविद्या महासंघ यांच्यावतीने आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्काराने सन्मानित.
कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या वतीने श्रीनिवास कदम-पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्काराने सन्मानित.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस ( )
मळोली तालुका माळशिरस येथील बारामती झटका चे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक 20 20 पुरस्कार देऊन कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याचे संघटक पैलवान सोमनाथ चव्हाण व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान राहुल वाघमोडे मित्र परिवाराच्या वतीने माळशिरस येथील बारामती झटका विभागीय कार्यालय येथे प्रशस्तीपत्र, मेडल, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी कुस्ती-मल्लविद्या गे माय भू फेडीन तुझे पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे या ब्रीद वाक्यवर देशांमध्ये आणि देशाच्या बाहेर सातासमुद्रापार कुस्ती पोहोचवण्याचे काम या कुस्ती मल्लविदेच्या माध्यमातून केले जात आहे अशा कुस्ती क्षेत्रांमध्ये अग्रगण्य असलेल्या कुस्ती मल्लविद्या महासंघाकडून श्रीनिवास कदम पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक 20 20 पुरस्कार देऊन सन्मानित केलेली आहे आज पर्यंत कुस्ती क्षेत्रख मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला आहे सदरचा पुरस्कार दिल्यानंतर बारामती झटका परिवार यांच्यावतीने कुस्ती मल्ल विद्येच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत.